संक्रांतीची नाती

वयम्    मंजिरी हसबनीस    2020-01-13 10:00:57   

शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. संक्रांत आणि पतंग या शब्दांचे नातेवाईक बघा किती आहेत ते! जानेवारी २०१५ मधील हा लेख नक्की वाचा.

जानेवारी महिना म्हटला की आठवण होते, ती ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ या शब्दांची आणि संक्रांतीच्या सणाची. आणि मित्रांनो, संक्रांतीची खरी मजा कशात आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर मला खात्री आहे, अगदी एका शब्दात तुम्ही त्याचं उत्तर द्याल. तो शब्द आहे ‘पतंग’. मस्त रंगीबेरंगी झुलणाऱ्या, तरंगणाऱ्या, वरखाली आकाशात झोके घेणाऱ्या पतंगांची जुगलबंदी बघण्यात तर मजा आहेच, पण त्याबरोबरच पतंगांची काटाकाटी करत त्यांची आपापसात चुरस रंगवण्यातही एक वेगळीच मज्जा आहे. पतंग आणि तिळगूळ यांच्यामुळे सदैव आठवणीत राहणारा असा हा संक्रांतीचा सण. हा काळ म्हणजे शेजारधर्म जपण्याचा काळ. परस्परांतील नाती, स्नेह, प्रेम वाढवण्याचा काळ. मित्रांनो, शब्दांनाही आपापली नाती असतात, बरं का. शब्दांना त्यांचे भाऊबहीण असतात, त्यांचा मित्रपरिवारही असतो. शब्द एकमेकांशी जुळवून आपण शब्दांचा छान गोफ विणू शकतो. तुम्ही ‘स्क्रॅबल’ खेळताना किंवा शब्दकोडी सोडवताना हेच तंत्र वापरता. शब्दांची ही जुळवाजुळव आपले ज्ञान कितीतरी पटींनी वाढवणारी असते. हा छंद एकदा का तुम्हाला लागला की पहा, तुमच्याजवळ शब्दांचा किती मोठा साठा जमतो ते. कारण शब्द ही संपत्ती आहे. ही संपत्ती अधिकाधिक वाढवण्यासाठी, चला, तर मग सर्वात प्रथम संक्रांती शब्द जाणून घेऊ या. संक्रांती हा शब्द ‘सम् +  क्रम्’ या क्रियावाचकापासून बनला आहे. या क्रियावाचकाचे अनेक अर्थ आहेत.  ‘सम् +  क्रम्’ म्हणजे कुणालातरी भेटणे किंवा काहीतरी ओलांडून पुढे येणे किंवा कुठेतरी प्रवेश करणे. आणि संक्रांतीचा सण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , भाषा , बालसाहित्य

प्रतिक्रिया

  1. patankarsushama

      5 वर्षांपूर्वी

    मस्त लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen