पुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत

वयम्    हेमंत मोने    2020-01-14 19:45:08   

संक्रांतीच्या सणाला तिळगूळ खाता खाता या सणाचे शास्त्र समजून घ्या, ते मजेदार आहे! 'वयम्' जानेवारी २०१८ मधील हा माहितीपूर्ण लेख- 

१४ जानेवारी म्हटलं की, आपल्याला आठवते ती मकर संक्रांत. दसरा, भाऊबीज, गणपती, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी इ. उत्सव किंवा सण आपल्या कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या तारखांना येतात; मग मकर संक्रांतच तेवढी जानेवारीला का येते, हा प्रश्न तुम्हांलाच नव्हे तर मोठ्यांनाही पडतो. अज्ञानाच्या बाबतीत पुष्कळ वेळा लहान - मोठा हा वयातला फरक नाहीसाच होतो. आपण वर ज्या सणांचा उल्लेख केला त्या सणांत, पौर्णिमा, अष्टमी, दशमी (दसरा म्हणजे विजया दशमी) यमद्वितीया (भाऊबीज) अशा तिथी दडलेल्या आहेत. तिथी ही चंद्रावर अवलंबून असते, त्यामुळे चांद्रमहिन्यातील तिथी (म्हणजे चैत्र, वैशाख इत्यादी महिने) आणि इंग्रजी महिन्याची तारीख यांचा एकमेकींशी निश्चित असा मेळ नसतो. कॅलेंडरचे म्हणजे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात, तर चांद्र वर्षाचे म्हणजे चंद्राच्या बारा महिन्यांचे दिवस ३५४ भरतात. मग तिथी आणि दिनांक (तारीख) यांचा मेळ कसा बसेल सांगा बरं! सूर्यसंक्रमण सूर्यसंक्रमण म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुस-या राशीत प्रवेश करणे. सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीत प्रवेश करतो. मग ते संक्रमण त्या त्या राशीच्या नावाने ओळखले जाते. अशा त-हेने मकर संक्रांत हा सण सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाशी निगडित आहे; तो तिथीवर म्हणजे चंद्रावर अवलंबून नाही. आपण रोज वापरतो ते इंग्रजी (ग्रेगोरियन) कॅलेंडर हे सूर्याच्या राशी किंवा नक्षत्रस्थानाशी जोडलेले आहे. त्यामुळे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश दरवर्षी १४ जानेवारीला होतो, त्यामु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , ज्ञानरंजन , बालसाहित्य

प्रतिक्रिया

  1. jyotijsathe

      5 वर्षांपूर्वी

    उपयुक्त माहिती. धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen