नुकतीच २३ जानेवारीला नेताजी बोस यांची जयंती झाली. या हुशार, लढवय्या स्वातंत्र्यसेनानीचे योगदान समजून घेऊया-
ओरिसा राज्यातील कटक येथे एकशे तेवीस वर्षांपूर्वी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. नसानसांत देशप्रेम भरलेल्या नेताजींनी विद्यार्थिदशेपासूनच इंग्रज सत्तेच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती. पूर्णवेळ देशसेवा हाच त्यांचा ध्यास होता, परंतु त्यांचा जवळचा मित्र हेमंतकुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी आय.सी.एस.ची परीक्षा द्यायची असे ठरवले. त्याला कारणही तसेच होते. इंग्रज अधिकारी तुच्छतेने असे म्हणत की, ‘भारतीय तरुण आयसीएसची परीक्षा पास होऊ शकत नाहीत, कारण ते मंदबुद्धीचे आहेत.’ इंग्रजांचा हा भ्रम मोडण्यासाठी नेताजींनी आय.सी.एस. परीक्षा पास करूनच दाखवायची असे ठरवले. सर्वोत्तम गुण प्राप्त करून आयसीएस होण्यासाठी नेताजी इंग्लंडला गेले. तिथे असताना त्यांनी लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकले. लोकमान्य म्हणाले, "इंग्लंडमध्ये शिकणाऱ्या भारतीय तरुणांनी सरकारी नोकरीत न शिरता साधी राहणी ठेवून आपल्या देशाची सेवा करावी; तुमच्यासारख्या उच्चविद्याविभूषित तरुणांची आज आपल्या मातृभूमीला गरज आहे....’’ या भाषणाचा नेताजींच्या मनावर फार प्रभाव पडला. नेताजी सुभाषचंद्र बोस आय.सी.एस. परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, तरी त्यांना इंग्रजांची चाकरी करणे पसंत नव्हते. तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड माँटिग्यू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी लिहिले होते - 'मी आय.सी.एस. झालो असलो तरी एकाच वेळी ब्रिटिश सरकारची व माझ्या देशा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .