राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे हे वर्ष! ३० जानेवारी १९४८ हा महात्मा गांधीजींचा स्मृतिदिन (मृत्युदिन). जगभरात ज्यांना मान आहे, अशा या आपल्या नेत्याचे महानपण आपल्या लक्षात राहावे, म्हणून त्यांच्या या काही गोष्टी वाचा. या गोष्टी लिहिल्या आहेत श्रेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी 'असे होते गांधीजी' या पुस्तकात. हे पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे.
गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. महात्मा म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, “इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला संडास साफ करतो. किती त्रासाचं काम असेल हे!” दुस-या दिवशी गांधींना पहाटे झोपून राहणं अशक्यच झालं. ते गुपचूप उठले. त्यांनी गरम चहा करून त्या भंग्याला दिला. स्वत: गांधी चहा पीत नसत. आता त्या कडाक्याच्या थंडीत गांधी रोज पहाटे उठून त्या भंग्याला चहा करून देऊ लागले. त्यालाही संकोच वाटू लागला. एक दिवस तो म्हणाला, “नको मी क्षुद्र माणूस. मला चहा करून देऊ नका.” गांधींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते नुसते निर्मळ हसले. दुस-या दिवशी पहाटे कडाक्याच्या थंडीत उठून गांधी नेहमीप्रमाणे चहाचा पेला घेऊन उभे होते. त्या भंग्याचे डोळे भरून आले. आपल्या आफ्रिकन भाषेत थरथरत्या स्वरात तो गांधींना म्हणाला, “देव तुमचं भलं करो.”हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
व्यक्तिविशेष , शिक्षण , प्रासंगिक , बालसाहित्य
प्रतिक्रिया
साधं, स्वच्छ माणूसपण
वयम्
शुभदा चौकर
2020-01-29 05:28:39

वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 7 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.