'गुगल मॅप' वापरूनही रस्ता चुकतो आपण! मग हिवाळ्यात आपल्याकडे येणारे पाहुणे बिनचूक कसे काय येतात? कोण कुठून येतात? आपण कुठे भेटू शकतो त्यांना?
आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे काही वेळापत्रक नसते,म्हणजे ते कधी येतील ते सांगता येत नाहीत आणि येणारे सगळेच पाहुणे आपल्याला आवडतातच असेही नाही.पण सारे काही वक्तशिरपणे करणाऱ्या निसर्गातले पाहुणे मात्र असे नसतात, एकतर ते ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी बरोब्बर येतातच आणि ते सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. हे पाहुणे म्हणजे जगाच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर न चुकता जाणारे, स्थलांतर करुन येणारे पक्षी. दरवर्षी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की पक्षी मित्र आतुरतेने वाट पाहू लागतात ती याच पंखवाल्या पाहुण्यांची. मग पक्षी मित्रांची पावलं हमखास परिसरातल्या तलावांकडे,खाड्यांकडे,नदीकिनारी आणि जलाशयांकडे वळतात. दर आठवड्याला कोण कोण आलंय याची उजळणी समान आवडीच्या मित्रांबरोबर होऊ लागते,कारण थंडीचा मौसम म्हणजे हिवाळी पाहुण्यांचा मौसम,हे पाहुणे तरी येतात कुठून तर कुणी लडाखमधून,कुणी चीनमधून,कुणी मध्य युरोप तर कुणी उत्तर आशियातून. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागली की शीत कटिबंधातील शेकडो प्रकारचे पक्षी हजारो,लाखोंच्या संख्येनं उष्ण कटिबंधातील त्यांच्या ठरलेल्या हिवाळी स्थानांकडे स्थलांतर करु लागतात. आपल्या भारतामध्ये ऑक्टोबरपासून हे हिवाळी पाहुणे यायला सुरवात होते आणि पुढे अगदी मार्च पर्यंत त्यांचा मुक्काम भारतातील वेगवेगळ्या पाणथळी,सरोवरे,नद्या,सागर किनाऱ्यांवर पाहायला मिळतो. पक्षी स्थलांतराकडे अगदी प्राचीन काळातच माणसाचं लक्ष वेधलं गेलं होतं याचे पुरावे ॲरिस्टॉटल,हिरोडोटस,होमर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .