काय ही थंडी?


हिवाळ्यात अंगात हुडहुडी भरते... थंडी वाजते म्हणजे नेमकं काय होतं ?

हिवाळ्यात अंगात हुडहुडी भरते... थंडी वाजते. का बरं असं होतं? आपल्या शरीराचं  तापमान (temperature) सुमारे ३७ डिग्री से. असते. थंडीत परिसरातील तापमान ३७ डिग्री से. पेक्षा कमी होतं. त्यामुळे हात, पाय, नाक, गाल गार होतात. याचा संदेश मेंदूत गेल्याने तो मज्जातंतूंना (न्युरॉन्स) शरीराचे नेहमीचे तापमान राखण्याची आज्ञा करतो. यावेळी देहाची स्वरक्षक-प्रणाली (सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम) कार्यरत होते. परिणामी देहाच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण वेगाने होते. त्यामुळे उष्णता निर्माण होऊन आपल्याला हुडहुडी भरते. क्वचित अधूनमधून हात, पाय, जबडा थरथरून दातही वाजू लागतात. अशा कडाक्याच्या थंडीत आपली त्वचा फुटते, रखरखीत होते. अशाप्रकारे थंडीत त्वचा ही सुरक्षाकवचाचे काम करते. त्वचेचे अंतर्त्वचा (उर्मिस) व बाह्यत्वचा (एपिउर्मिस) असे दोन भाग असतात. बाह्यत्वचेत पेशींना एकावर एक असे अनेक थर असतात. जिवाणू-विषाणू वा इतर रोग यांच्या प्रसारात हे थर सुरक्षाकवच बनतात. यातील बाह्यत्वचा मृत होऊन आतील थर मात्र नियमितपणे तयार होतो. या थरांमध्ये तैलग्रंथी (सेबॅशिअस ग्लँड) व धर्मग्रंथी (स्वेटग्लँड) असतात. तैलग्रंथीतील ‘सिबम्’ हे केसांच्या बीजकोषाला तेल पुरवते. या बीजकोषातून केस तयार होतात. सिबम नलिकांमधून तेल त्वचेवर येते आणि त्वचा नरमते. धर्मग्रंथीतून घाम स्रवताच त्यातील पाणी, उष्मा, युरिआ, अमिनो आम्ले ही देह्तापमान व क्षार यांचे कार्य सुरळीत करतात. पण याचवेळी त्वचेवरील सर्वांत बाहेरील पेशीथर मरून तो झडतो. परिणामी त्वचा रखरखीत होऊन फुटते. तसेच वातावरणात तापमान व आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचेस ओलसरपणा येतो. मात्र त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen