पोह्यांचा चिवडा- मस्त आणि फस्त! 

वयम्    आनंद घैसास    2020-02-11 10:00:20   

चिवडा हा पदार्थ चवीला मस्त! पहिला घास तोंडात गेला, की मग तो संपेर्पंत खातच राहावासा वाटतो. पण अर्थातच तो जर चामट, तिखट किंवा जास्त खारट नसेल तरच! चिवडा करायला खरंच सोपा आहे का? की त्यातही काही वैज्ञानिक तंत्र सांभाळावी लागतात?

चिवड्यांचे विविध प्रकार असतात. पोह्यांच्या चिवड्यात एक पातळ पोह्यांचा, दुसरा जाड पोह्यांचा. एक कच्चा, एक तळणीचा. कुरमुऱ्यांचा, भडंगाचा, मक्याच्या लाह्यांचा, तर कधी पोहे-कुरमुरे मिक्स. चिवडा कुठलाही असला तरी तो कुरकुरीत असलाच पाहिजे, तरच तो आपल्याला आवडतो. हा कुरकुरीतपणा आणणे हे महत्त्वाचे काम असते. तसेच पोहे, कुरमुरे (काही जण चुरमुरे किंवा मुरमुरेही म्हणतात) तयार कसे करतात, ते जाणून घेणेही मनोरंजक आहे. पोहे करण्यासाठी तांदूळ नाही, तर अखंड साळी, म्हणजे टरफलासहीतचे दाणे (ज्याला काही जण भात म्हणतात) घेतात. रात्री कोमट पाण्यात ते भिजत घालतात. रात्रभर चांगले भिजू देतात. सकाळी त्यातील पाणी निथळून टाकतात. मग रेतीसोबत मोठ्या लोखंडी कढयांमध्ये ते तापवले जातात. त्याला जरी ‘भाजणे’ म्हणत असले तरी 110 ते 180 अंश सेल्शिअसपेक्षा अधिक तापमान होणार नाही, असे पाहिले जाते. काही यंत्रांमध्ये बारीक रेतीवर पसरून 230 अंश सेल्शिअस तापमानाला फक्त 40 ते 50 सेकंद साळी भाजण्याची व्यवस्था केलेली असते. या प्रकारात जणू काही साळीच्या कवचात असलेला तांदूळ आतल्या आत अर्धवट शिजतो. त्याचवेळी साळीचे कवच आणि त्याच्या आत असलेले दाण्याभोवतीचे तूस सुटे होते. चाळणीने रेती काढून टाकली जाते. त्यानंतर लाकडाच्या किंवा दगडाच्या (काही यंत्रांत पोलादी सिलिंडर वापरतात) चरकातून ठरावीक दाबाखाली ही साळी चपटी होण्यासाठी पाठवली ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बालसाहित्य , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया

  1. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला. साळीपासून पातळ पोहे,जाड पोहे,मुरमुरे,भाजके मुरमुरे कसे तयार करतात व चिवडा बनवण्याची संपूर्ण पाककृती खूप छान सांगितली आहे.धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen