‘त्रियात्री’ या दर्जेदार सिनेमाविषयी-
शाळेमधील स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल संपवून तुम्ही आता वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागला असाल, नाही का? आई-बाबा आणि शिक्षक यांच्याकडून अवघड वाटणा-या विषयांची उजळणी अधिक प्रमाणात करण्याची सूचना सतत मिळत असली तरी आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास पुन्हा पुन्हा करावासा वाटतो ना ? पण आपण हा अभ्यास का करतोय.. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का ? तुम्ही म्हणाल, सोपं आहे- आपण अभ्यास करतो तो आपल्या आवडत्या क्षेत्राचं शिक्षण देणा-या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी! पार्वती मेनन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘त्रियात्री’ या चित्रपटातील रवी, आदी आणि सूर्या या तीन जीवश्चकंठश्च मित्रांनासुद्धा दहावीनंतर त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी भरपूर अभ्यास केलाय. तिघांनाही ८० टक्के मार्क्स मिळाले आहेत. मात्र दुर्दैवाने त्यांना मिळालेले मार्क्स त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्या महाविद्यालयाची कट्ऑफची यादी पाहून हे तिघेजण हिरमुसले होतात. त्यात भर पडते ती महाविद्यालयाच्या चौकीदाराने केलेल्या अपमानाची! ज्यांना ८५ टक्के अधिक मार्क्स आहेत, त्यांनाच कॉलेजच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी हा चौकीदार देतो. चौकीदाराशी भांडण करून हे तिघेजण एका हॉटेलमध्ये येतात. रागाच्या भरात सूर्या तिथल्या वस्तूंची मोडतोड करतो. नेमका त्याचवेळी एक पोलिस इन्स्पेक्टर तिथे येतो. सूर्याच्या रागाचं कारण त्याला समजतं तेव्हा इन्स्पेक्टर त्यांना समजावतो आणि आपल्या शक्तीचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांना देतो. आवडत्या महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यामुळे निराश झालेल्या या तिघां ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
6 वर्षांपूर्वीसुरेख!