रंगांची ओळख

वयम्    डॉ. बाळ फोंडके    2020-03-06 10:00:13   

आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान.

आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर  हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे. तसं पाहिलं तर रंगांची मजल इंद्रधनुष्याच्या तानापिहिनिपाजा या सात रंगांपर्यंतच जाते. त्या चौकटीतले सात रंगच तसे आपल्या ओळखीचे असतात, पण त्यातही विविध छटा असतात. गवताचा रंग हिरवा, पोपटाचाही हिरवा, कैरीचाही हिरवा आणि ऑलिव्हचाही हिरवाच. पण त्यांच्यामध्येही बारीकसारीक असले तरी फरक आहेतच. साडीला मॅचिन्ग ब्लाऊजचं कापड विकणार्‍याला विचारा. तो कोणत्याही एकाच रंगाच्या अगणित छटा वेगवेगळ्या दाखवू शकतो. केवळ आपल्या नजरेनं तो त्या ओळखू शकतो. त्यात परत या सात रंगांमध्ये ज्यांची नावं येत नाहीत असे कोनफळी, गुलाबी, केशरी, आकाशी, राणी, चॉकलेटी, मातकट असेही अनेक रंग आपल्या भेटीला येतात. शिवाय या सात रंगांच्या पलीकडेही रंग आहेतच. ता म्हणजे तांबड्याच्या पलीकडे इन्फ्रारेड किंवा अवरक्त, तर जा म्हणजे जांभळ्याच्या अलीकडे अल्ट्राव्हायोलेट किंवा जंबूपार. त्याही पलीकडे आणखी काही. पण हे रंग आपण पाहू शकत नाही. ते पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये नसते. म्हणूनच मग प्रश्न पडतो की हे सात रंग ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , बालसाहित्य , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen