प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का?
प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात. आपल्या त्वचेच्या खाली जसे मेलॅनिन हे रंगद्रव्य असते, तशीच निरनिराळी रंगद्रव्ये प्राण्यांच्या त्वचेत असतात. लाल-गुलाबी प्राणी, पक्षी, रंगीत मासे यांच्या त्वचेत कॅरेटिनॉईडस् ही रंगद्रव्ये असतात. ही कॅरेटिनॉईडस् त्यांच्या शरीरात तयार होत नाहीत, तर ती खाण्यावाटे त्यांच्या शरीरात पोहोचतात. तांबड्या-गुलाबी पंखाचा रोहित पक्षी (फ्लेमिंगो) दिवसभर तांबड्या कोलंब्या खातो आणि तोच रंग त्याच्या पंखावर चढतो. म्हणून तर त्याला ‘अग्निपंख’ असेही नाव आहे. कोलंब्या सागरी जालातले सूक्ष्म शेवाळे खातात म्हणून त्या लाल होतात. शेवाळांना मात्र स्वतःचा कॅरेटिनॉईडस् रंगद्रव्य निर्माण करता येतो. अन्नसाखळीच्या मार्गाने रंग एकाकडून दुसरीकडे जातो. आहे की नाही गंमत! मग तुम्ही म्हणाल, गाई आणि काळ्याकभिन्न म्हशी हिरवंगार गवत खातात तरी त्या हिरव्या का नाही होत ? तर त्याचे कारण असे आहे की, हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल हे पचनक्रियेत साफ बदलून जाते. काही प्राण्यांच्या शरीरात क्रोमॅटोफोर्स (रंगद्र्व्यांच्या पेशी) असतात. या पेशींचा आकार, त्यात असलेले रंगद्र्व्याचे प्रमाण इ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .