सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख-
“आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता. आई आपला मोबाईल घेऊन मजेत त्या दोघांच्या मध्ये बसली. “ह्या तानापिहि भिंगरीतला तांबडा भाग तांबडा का दिसतो? त्याच्यावर प्रकाश पडला की तो सूर्यप्रकाशातला फक्त तांबडाच प्रकाश परत फेकतो आणि बाकीचे सगळे रंग शोषून घेतो. नारिंगी, पिवळा, हिरवा, सगळे भाग आपापल्या रंगाचा प्रकाश तेवढा परत पाठवतात. तुम्ही भिंगरी फिरवली की त्या साती भागांकडून येणारे प्रकाशकिरण एकत्र होतात आणि सात रंगांची बेरीज होऊन तुम्हांला पांढरा रंग दिसतो. आपल्या भोवती अनेक रंग असतात. पण निळा, हिरवा आणि लाल हे तीन प्राथमिक रंग. इतर सगळे रंग निळा-हिरवा-लाल या तीन प्राथमिक रंगांच्या वेगवेगळ्या प्रमाणातल्या बेरजेने बनलेले असतात. बशीतल्या मिश्रणाची गोष्ट वेगळी. तिथल्या तांबड्या ठिपक्याकडूनही तांबडाच रंग परत येतो आणि बाकीचे शोषले जातात. पण त्याच्यात निळा ठिपका मिसळला की तांबडा ठिपका निळा रंग शोषतो आणि निळा ठिपका तांबडा रंग शोषतो. परतणाऱ्या प्रका ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .