शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया.
`होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी. या सगळ्याची आठवण झाली असेल, होय ना. काय मग लागले का तुम्हाला होळीचे वेध ? फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत साजरी होणारी ही होळी कुठे होलिकोत्सव या नावाने तर कुठे होलिकादहन, हुताशनी महोत्सव अशा नावांनी ओळखली जाते. कोकण गोमंतकात तिला शिग्मो म्हणजेच शिमगा असं म्हणतात. या नावाचीही एक जन्मकथा आहे, बरं का. पूर्वी फाल्गुन मासातील या कालखंडाला सुगिम्हअ म्हणजे `सुग्रीष्म’ असं म्हटलं जाई. कारण हा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतूचा काळ. या सुग्रीष्मपासून शिग्मो शब्द तयार झाला व पुढे वर्णविपर्यययोग म्हणजे अक्षरांच्या अदलाबदलीने शिमगा असा शब्द रुढ झाला. होळी पेटवण्याच्या परंपरेचीही एक जन्मकथा आहे. पूर्वी म्हणे फाल्गुन मासातील या काळात एक राक्षसीण गावागावात हिंडत असे. लहान मुलांना त्रास देणारी ही राक्षसीण महाभयंकर होती. हिंस्र, अक्राळविक्राळ असं तिचं स्वरुप होतं. ती लहान मुलांना घाबरवत असे. त्यांचा पाठलाग करत असे. होलिका, होलाका, ढूंढा, ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
समाजकारण
, प्रासंगिक
, भाषा
, बालसाहित्य