गुढीपाडवा म्हणजे चैत्राची सुरुवात. वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक सृष्टी कशी करते, त्याचं रंगतदार वर्णन करणारा ललितलेख-
मित्रांनो, निदान पूर्वीतरी प्राथमिक शाळेत काही गोष्टी अगदी घोकून घेतल्या जात असत. त्यात ३०पर्यंतचे पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी हेही पाठ करायला लागायचे. काही हुशार मुलं तरऔटकीपण पाठ करायचे. ती सगळ्यात कठीण, त्यामुळं हुशार मुलंच ती पाठ करत. पण पाढे आणि श्लोक यांच्याशिवायही काही गोष्टी सगळ्यांकडूनच पाठ करून घेतल्या जात. त्यातली एक म्हणजे ऋतुचक्र! किंवा ऋतूंचं घड्याळ!! म्हणजे चैत्र-वैशाख = वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ = ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद = वर्षा ऋतू, आश्विन-कार्तिक = शरद ऋतू, मार्गशीर्ष-पौष = हेमंत ऋतू आणि माघ-फाल्गुन = शिशिर ऋतू! आपलं सृष्टीचं अद्भुत चक्र कोणत्या क्रमानं चालत असतं, तेच यातून समजायचं. प्रत्येक ऋतूचं वेगळेपण अगदी प्रकर्षानं अनुभवायला यायचं; कारण त्यावेळेला आजच्या इतकं वातावरण बिघडलेलं नव्हतं. म्हणजे हवेचं प्रदूषण आता इतकं नव्हतं. त्यामुळं ऋतुचक्र अगदी अचूकपणं यायचं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र हवेतल्या वाढत्या प्रदूषणामुळं सृष्टीच्या म्हणा किंवा निसर्गाच्या म्हणा, चक्रात थोडा बदल व्हायला लागला आहे. त्याचं अगदी चटकन पटणारं उदाहरण म्हणजे पावसाळा! म्हणजे बघा की पूर्वी अनुभव असा यायचा की मृग नक्षत्र ७ जूनला लागलं की त्या दिवशी पावसाला सुरुवात व्हायची. त्या दिवशीसुद्धा दिवसभर उन्हाचा कडाका असायचा. अंगाची अगदी लाही लाही होऊन जायची. दुपार तर नकोशी वाटायची. पण चार-साडेचार वाजले की वातावरणात बदल होऊ लागायचा. हळूहळू वारा सुटायचा. मग तो वेगानं वहायला लागायचा. अंगणातला पालापाचेाळ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रासंगिक
, ललित
, बालसाहित्य
rsrajurkar
5 वर्षांपूर्वीनिसर्गाचा उत्सव खूप छान लेख.
kaustubhtamhankar
5 वर्षांपूर्वीसध्या मी शहर सोडून सासवणे या गावी येउन राहिलो आहे. शहरातील सिमेंट काॅंक्रीटचे जंगल मागे पडलच आणि आता आम्ही प्रत्यक्ष जंगलात नसू पण चहूबाजूने वेढलेल्या वृक्षांच्या सानिध्यात रहात आहोत आपल्या लेखातील शिशीर आणि ग्रिष्म ृृृृृऋतू सध्या आम्ही अनुभवत आहोत . रोज होणारी पानगळ गोळा करताना जेंव्हा सहज बघितलेतर झाड आपल्याकडे बधून हसतय असे वाटते. आता वसंत ृृृऋतु सुरू झाला आहे नव्या पालवीच्या स्वगताला आम्ही सामोरे जात आहोत. तशात तुमचा हा लेख वाचनात आला आणि प्रत्यक्ष बघितलेले पुन्हा प्रत्ययास आले. बढिया .