करोना सुट्टीच्या काळात बच्चे कंपनी पापड, शेवया असे बेगमीचे पदार्थही बनवू लागली. मुळात बेगमी म्हणजे काय, ती का करायची, हे या काळाने शिकवले त्यांना! आणि घरच्यांशी मनसोक्त गप्पा मारण्यातून त्यांना कितीतरी नव्या जाणिवा झाल्या... हीही बेगमीच, त्यांना पुढच्या आयुष्यात पुरेल अशी!! …‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात एव्हाना शेकडो मुले लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचा भाग 13.
गरमागरम सामोश्यांची गम्मत ! माझी ताई माझ्यासाठी स्कुबी बनवायची. हे स्कुबी बनवणं मला खूप कठीण वाटायचं. ही गुंतागुंतीची कला आहे, असं वाटायचं. पण आता वेळ होता तर मी स्कुबी बनवण्याची कला शिकून घेतली. एक स्कुबी बनवायला किमान तीन दिवस लागले. पण आता ते सुंदर स्कुबी घरात लटकवताना खूप आनंद होतो. टीव्हीवर सामोश्यांची जाहिरात लागते- घाला पिठामध्ये तेल... मग कोन बनवा रे.. हळद, मिरची, मीठ मिसळून.. गरम तेलात तळा रे... खरंच मी ते खूप मनावर घेतलं आणि तशीच्या तशी रेसिपी केली. त्या सामोश्यामध्ये मीठ खूप घातलं, त्यामुळे सामोसा खूप खारट लागला. आई मला खूप हसली. मला रडायलाच आलं. मग आईने मला मीठ, तिखट प्रमाणात घालायला शिकवलं. तेल गरम झाल्यावर मी सामोसा तेलात टाकला, तर तेल माझ्या तोंडावर उडालं. माझ्या चेहऱ्यावर दोन-तीन फोड आले, पण मी बनवलेला सामोसा खूप स्वादिष्ट होता. गच्चीवर कपडे सुकत घालताना मी बाकी सगळ्या कपड्यांची घडी घालायचे, पण साडी तिथेच ठेवायचे. आई मला म्हणाली की, मी तुला साडीची घडी घालयला शिकवते. आता मला साडीची घडी घालता येते. या सुट्टीत मी शेडिंग शिकले. चित्र कलर करतान ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शिक्षण
, पालकत्व
, बालसाहित्य