‘वयम्' अनुभव-लेख मालिका 16 : तीव्र संवेदनशीलता

वयम्    शुभदा चौकर    2020-06-11 12:10:20   

नवनवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही? मुलांना तर वेगवेगळं, चटकदार खायला हवच असतं ना! मात्र सध्याच्या परिस्थितीत आपण गरजा आणि चैन यांतील फरक समजून घेतला पाहिजे, याची जाणीव या मुलांनाही लख्खकन् झाली! मुलांची संवेदनशीलता किती तीव्र आहे बघा!! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या... वाचा ‘वयम्' अनुभव-लेख मालिका 16’-

मर्यादित गरजांची जाण  नुकतीच मी ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘अपूर्वाई’ ही दोन पुस्तकं वाचली. शिवाय, पु. ल. देशपांडे यांचं अभिवाचनही ऐकलं. त्यामुळे त्यांच्या लेखनाची मजा द्विगुणीत झाली. आईला आणि मला नाटकांचा भारी नाद. यूट्यूबवर ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, ‘यदाकदाचित’ आणि ‘बटाट्याची चाळ’ ही गाजलेली नाटकं पाहिली आणि मराठी साहित्याच्या प्रेमातच पडले. सध्या मी ऑनलाइन वेबसाईट, यूट्यूबच्या माध्यमातून जपानी भाषा शिकत आहे. शिवाय मला पेंट प्रोग्रॅमवर चित्रं काढायला आवडतात. या सुट्टीत काही नवीन चांगल्या सवयी लावून घेतल्या. रोज न चुकता व्यायाम आणि प्राणायाम करू लागले. दररोज तिन्हीसांजेला सहकुटुंब रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष अशी स्तोत्रं म्हटल्यामुळे मनाला अगदी प्रसन्न वाटतं. शिवाय आईकडून आप्पे, इडली-सांबार, फ्राइड राईस, केक आणि रोजचा स्वयंपाक शिकून घेतला. आपल्या गरजा किती नाममात्र आहेत आणि आपण किती अनावश्यक गोष्टींच्या मागे लागतो, याची जाणीव झाली. घरातील कुटुंबीयांशी जवळीक वाढली. निसर्गदेखील संधीचं सोनं करत स्वतःला झालेल्या जखमा भरून काढत आहे. ही जागतिक आपत् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बालसाहित्य

प्रतिक्रिया

  1. bookworm

      12 महिन्यांपूर्वी

    फारच छान!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen