यंदा करोनाच्या काळात सर्वत्र ताळेबंदी असूनही SSC बोर्डाची पाठ्यपुस्तके वेळेत तयार झाली. टी वेबसाइटवर आली. काही मुलांच्या हातातही आली. पाठ्यपुस्तक हे शालेय अभ्यास शिकण्याचं महत्त्वाचं माध्यम! पाठ्यपुस्तकं कोण, कशी तयार करतं? जाणून घेऊया? ‘वयम्’ मासिकाच्या जुलै 2014 च्या अंकातला लेख आहे हा! ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'
“स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. पेटलेली मेणबत्ती स्थायू अवस्थेत असते, तिच्यापासून ओघळणारे मेण द्रव अवस्थेत, तर ज्योतीतील जळणारे मेण वायू अवस्थेत असते…’ “स्वप्निल, अरे कोणतं जुनं पुस्तक वाचतोयस; पदार्थाच्या अवस्था तीन?” “हो ताई, आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात असच दिलंय.” “आमच्यातर विज्ञानाच्या पुस्तकात पाच अवस्था दिल्यात. म्हणजे तुमच्या पुस्तकात चुकीची माहिती आहे.” “अगं, नाही आम्हाला शाळेतही असंच सांगितलंय” “पण तू लक्षात ठेव, पदार्थाच्या अवस्था पाच!” “नाही, तीन!” “पाच!” वाद वाढायला लागला तसं आईला लक्ष घालावच लागलं. नेहा आणि स्वप्निल आपापल्या मुद्यावर ठाम होते. स्वप्निल सातवीच विज्ञानाचं पुस्तक वाचत होता आणि नेहा त्याच्याशी तिच्या ९ वीच्या पुस्तकात वाचून वाद घालत होती. आईच्या सर्व प्रकार लक्षात आला. ती त्यांना म्हणाली, “तुम्ही शेजारच्या शोभाताईंकडे का नाही जात, त्या शाळेत विज्ञानच तर शिकवतात.” दोघानांही ते पटलं. दोघेही शोभाताईंकडे गेले. स्वप्निल म्हणाला, “मावशी तूच सांग, पदार्थाच्या अवस्था तीन की पाच? माझ्या पुस्तकात दिलंय तीन! ताई म्हणते पाच!” “माझ्या पुस्तकात दिलंय तसं. प्लाझ्मा आणि बोस... आईनस्टाईन कंडेनसेट.” “तुमचं दोघांचही ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vilasrose
5 वर्षांपूर्वीलेख आवडला.शाळेची पुस्तके कशी तयार होतात,त्याची चांगली माहिती मिळाली. तसेच प्रत्येक विषयाची भाषा कशी वेगळी असते,ते समजले.
[email protected]
5 वर्षांपूर्वीखुप छान. अशी माहिती कधी इळाली नव्हती. धन्यवाद.