पाऊस पडला की अगदी आठवड्याभरातच आपल्या आजूबाजूचं चित्र हिरवंगार होतं. कवी ना. धों. महानोरांच्या भाषेत सांगायचं तर ‘आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा!’ मग हे सृष्टी लावण्य खुलतं कसं? हे समजून घेऊया जिल्पा निजसुरे यांच्या लेखातून!'वयम्' मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख वाचा आणि तुम्ही काय काय नवीन पाहिलंत ते जरूर कळवा-
पाऊस येताच निसर्गात अनेक बदल घडू लागतात. पावसाळ्यात बहरणाऱ्या वनस्पती बघितल्या तर कळतं की, निसर्गाने सभोवताली रंगांची कशी उधळण केली आहे. पहिल्या पावसात पहिला नंबर लावते रानहळद. हळदीच्या कुळातलीच ही वनस्पती. त्याच्या फुलांचा तुरा हा जमिनीतूनच बाहेर येतो. लांबून गुलाबी व पांढरा दिसणाऱ्या तुऱ्याचे जवळून निरीक्षण केल्यास आपल्याला त्याची गुलाबी-पिवळी फुले दिसतात. लांबून दिसणारी गुलाबी फुले म्हणजे खरी फुले नसून फुलांच्या बाहेरील संरक्षक आवरण आहे. त्याला इंग्रजीत bract असे म्हणतात. या फुलाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्याच्या स्त्रीकेसराचा आकार हा गोमुखासारखा असतो. अशीच दुसरी वनस्पती म्हणजे भुईआवळा. साधारण अर्धा फूट वाढणाऱ्या या वनस्पतीचे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की, आवळ्यासारखी पाने आणि आवळ्यासारखीच फळे याच्या पानांच्या खाली रांगेने लागली आहेत. म्हणूनच ह्याला भुईआवळा म्हणतात. या वनस्पतीमध्ये कावीळ तसेच यकृताच्या विकारांवर उपयोगी येणारे औषधी गुणधर्म आहेत. सर्वदूर पसरलेल्या हिरव्या गालिच्याला अजून निरखून पहिले तर अळूच्या पानांसारखी पाने असलेला रानअळू आपल्याला बघायला मिळेल. हिरवी पाने व हिरवे देठ असलेल्या या अळूच्या पानांच्यामधून एक पिवळे लांबट फूल दिसते. उमलण्याप ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .