अद्भुत अंटार्क्टिका भाग १


सूर्याच्या आकाराचा दिसणारा चंद्र, हिऱ्यासारखे चमचमणारे तारे, ताशी दोन-अडीचशे कि.मी. वेगाने घोंघावणारे वारे... असा अद्भुतरम्य आणि नितांत सुंदर खंड आहे अंटार्क्टिका. भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडवर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला- भूतलावर दृष्टी पोहचू शकेल तेथपर्यंत आच्छादलेली आणि मैलोनमैल पसरलेली बर्फाची चादर, त्यावर स्वर्गलोकातून अवतरणारे आणि आसमंतात सर्वत्र उधळणारे मनोहर रंग! येथे सूर्य पूर्वेलाच उगवतो असे नाही आणि पश्चिमेलाच मावळतो असेही नाही. एवढेच नाही तर कधी सूर्य उगवला तर मावळतच नाही आणि कधी मावळला तर उगवतच नाही! हिर्यासारखे चमचमणारे तारे, सूर्याच्या आकाराचा दिसणारा चंद्र, ताशी दोन-अडीचशे कि.मी. वेगाने घोंघावणारे वारे असे सारे आहे या खंडावर.. अद्भुतरम्य आणि तेवढाच गूढ, पृथ्वीच्या तळाशी असलेला हा खंड- अंटार्क्टिका! अशा या नितांत सुंदर आणि एका आगळ्यावेगळ्या जगात जाण्याची संधी मला मिळाली. सुमारे वर्षभर राहून या अलौकिक व स्वर्गीय निसर्गाचा अनुभव घेता आला मला. अंटार्क्टिकामध्ये आपल्या देशाची दोन शास्त्रीय संशोधन केंद्रे आहेत- ’मैत्री’ आणि ’भारती’. येथील मैत्री केंद्रात ३६व्या भारतीय संशोधन मोहिमेत एक डॉक्टर म्हणून सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. या खंडाला अंटार्क्टिका हे नाव मिळाले एका ग्रीक शब्दावरुन! अंटार्क्टिका = अँटी + आर्कटाईक. अँटी म्हणजे विरुद्ध आणि आर्कटाईक म्हणजे सप्तर्षी. उत्तर गोलार्धातून आकाशात दिसणारे

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , अनुभव कथन , बालसाहित्य , स्थल विशेष
पर्यावरण

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय उत्कंठावर्धक व विस्मयकारक माहिती!!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen