बजेट समजून घेऊ या!


'बजेट’ हा शब्द सध्या रोज वाचायला आणि ऐकायला मिळतोय. बजेट म्हणजे नेमकं काय, ते का मांडलं जातं, हे समजून घेऊ या. बालमित्रहो, 'बजेट सादर झाले’, 'बजेटवरची चर्चा संसदेत रंगलीये’, 'बजेट’मध्ये काय किमती कमी-जास्त होतात बघू या’ अशा प्रकारची बोलणी तुमच्या कानांवर पडत असतील. एरवीसुद्धा एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी करायची असेल तर खरेदीचं 'बजेट’ काय असेल याच्या चर्चा होतात. किंवा ती वस्तू बजेटपूर्वी खरेदी करायची की बजेटनंतर याचाही विचार करताना तुम्ही आई-बाबांना पाहिलं असेल. तात्पर्य काय, तर 'बजेट’ हा शब्द तुम्हांला नवीन नाही. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की बजेट म्हणजे काय? आणि त्याची एव्हढी धास्ती, काळजी का वाटते लोकांना?  अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर बजेट म्हणजे जमाखर्च. आपल्याला किती पैसे मिळणार आहेत आणि आपल्याला किती खर्च करायचे आहेत, किती पैसे साठवायचे आहेत याचा अंदाज. तुमचे आई-बाबा नोकरी करत असतील तर महिना संपून नवीन महिना सुरू व्हायच्या आधी घरात बोलणी होतात. आता पगार झाला की सर्व बिलांचे पैसे दिले पाहिजेत, कामवाल्या बाईंचा पगार दिला पाहिजे, या महिन्यात मुलांची शाळेची फी भरायची आहे, त्यामुळे फार काही सेव्हिंग होणार नाही. सगळ्याच  घरांमधून थोड्याफार प्रमाणात असं अंदाजपत्रक तयार होत असतं ना,तसंच अंदाजपत्रक देशाचंही होतं असतं. भारतासारख्या देशात कितीतरी राज्यं आहेत, लोक  आहेत. ज्यावर खर्च करायचा आहे, अशा कितीतरी गोष्टी आहेत. उदा. रस्ते बांधायचे असतात,पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अर्थकारण , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen