चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग जेव्हा जगाचे 'हिरो’ झाले, तेव्हा त्यांच्या लहानग्या मुलांना काय वाटलं असेल? अशा 'ग्रेट’ बाबांच्या कोणत्या आठवणी या मुलांपाशी असतील?... वाचा तर! आणि ऐकासुद्धा ! लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केलंत की तुम्हांला ऐकायला मिळेल. मुलांना, घरातील सर्वांना एकत्र बसून ऐकायला मजा येईल. 'बाबा आणि त्यांचे एडविन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे सहकारी चंद्रावर जाऊन परत आल्यानंतर त्यांना काही दिवस बंदिस्त जागेत वेगळं ठेवण्यात आलं होतं. चंद्रावरून येताना त्यांच्याबरोबर काही जीवजंतू आले असले तर त्याचा त्रास इतरांना होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली गेली होती. ते सर्वजण ह्यूस्टनमध्ये राहात होते. बाबांना भेटायला मी आणि माझा भाऊ मार्क जात असू. बाबा आम्हांला भेटायचे. पण आमच्या त्या भेटींमध्ये चंद्राबाबत ते काही आमच्याशी बोलल्याचं आम्हांला फारसं आठवत नाही. मात्र आम्ही सध्या काय करत आहोत? आमचा अभ्यास कसा चालू आहे? आम्ही आमच्या आईला मदत करतो किंवा नाही? आमच्या घराच्या मागच्या आणि पुढच्या परसातलं गवत आम्ही नियमतिपणे कापतो की नाही?... अशा गोष्टींची चौकशी ते करायचे, हे मात्र लख्खपणं आठवतं,' असं रिक सांगतो. रिक आणि मार्क ही चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांची मुलं. अलीकडेच त्यांनी आपल्या वडिलांनी जपून ठेवलेल्या वस्तूंचा लिलाव केला. त्या लिलावातून ५० लाख अमेरिकी डॉलरपेक्षाही जास्त रक्कम मिळाली! त्यामध्ये ध्वज, पदकं, चंद्रावर चालता ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .