सत्याचा शोध

वयम्    श्रीराम शिधये    2019-02-26 13:50:47   

सर सी. व्ही. रामन या थोर शास्त्रज्ञाने ज्या दिवशी त्यांच्या संशोधनाची घोषणा केली, तो दिवस देशभर 'राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा होतो. हे निमित्तच मुळी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. जे असत्य आहे, खोटं आहे, ते नाकारण्याची तयारी असणं, ती शक्ती आपल्यात असणं हेच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य! आज एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीची फळे चाखणारा समाज दुसरीकडे भोंदू बुवा-बाबांच्या आहारी जाताना दिसतो, तेव्हा समाजाला विज्ञानाभिमुख बनण्यासाठी उत्तेजन देण्याची किती गरज आहे, हे लक्षात येते.   फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन’ देशभर साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून.  भारताचे नोबेल पारितोषिक मिळवणारे थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी दि. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी कलकत्ता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेत आपल्या संशोधनाची घोषणा केली. हे संशोधन 'रामन परिणाम’ म्हणून ओळखलं जातं. याच संशोधनाबद्दल रामन यांना १९३० साली नोबेल पारितोषिक मिळालं. रामन यांच्या या संशोधनकार्याचं स्मरण कायम राहावं, त्यांच्या ध्येयनिष्ठ आणि विज्ञानालाच वाहून घेतलेल्या जीवनापासून नवीन पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठीच दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना 'नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन’ (एनसीएसटीसी) या संस्थेनं भारत सरकारला केली आ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , बालसाहित्य , विज्ञान- तंत्रज्ञान , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen