शक्य तरी आहे का हे? परीक्षेशी आणि फ्रेंडशिप? परीक्षा नकोशी वाटते. तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? आपल्याला अजून अशा अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. त्या प्रत्येक वेळेला हेच करून बघ. आपण वर्षभर अभ्यास करतोच. धडे वाचणं, प्रश्नोत्तरं वाचणं, गणितं सोडवणं, लेखनाचा सराव करणं- हे तर असतंच. पण या केलेल्या मेहनतीचं योग्य फळही तुला मिळायलाच हवं. यासाठी सुचवलेल्या गोष्टी नक्की करून बघ. शत्रूंना नो एन्ट्री कधी आळस, कधी कंटाळा, भीती, अतिशय ताण, न आवरता येणारी झोप- हे सध्या तरी आपले शत्रूच आहेत. त्यांना लांब ठेवू शकलो, तर फारच भारी काम होईल. चित्रांतून अभ्यास कर वही विज्ञानाची असू दे, भूगोलाची किंवा इतिहासाची; अभ्यास म्हणजे फक्त विविध प्रश्नांची उत्तरं असतात. आता या उत्तरांजवळच्या समासात तुझ्या लक्षात राहील असं लहानसं चित्रही काढ. ही चित्रं त्या त्या उत्तरांशी संबंधित असायला हवीत; आकृतीच्या स्वरूपात असावीत. प्रश्नाचं उत्तर आठवायच्या वेळेला ही चित्रं आठवतील. किंवा आधी हे चित्र आठवेल आणि मग उत्तर आठवेल. अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये चित्रंही असतात. काही ठिकाणी, नीट समजावं म्हणून आकृत्या असतात. या आकृत्या नीट बघ. लक्षात ठेव. यातलं काहीही शक्य नसेल तर महत्त्वाच्या वाक्यांच्या खाली रंगीत पेन्सिलीने / स्केचपेनने खुणा कर. यातून मेंदूतल्या रंगपेशींना काम मिळतं, त्यामुळे लक्षात राहतं. वेळेवर झोप आणि वेळेवर ऊठ! हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शिक्षण , पालकत्व , बालसाहित्य
प्रतिक्रिया
परीक्षेशी फ्रेंडशिप
वयम्
डॉ. श्रुती पानसे
2019-03-08 15:35:47