गणिताशी गळामिठी


गणित म्हणजे डोकेदुखी असं वाटणाऱ्यांनी ही कविता जरूर वाचा.

गणिताच्या  आठवणीने पोटी फिरे मोठा गोळा अंक सारे भिरभिरायचे अन् चिन्हांचा मग घोटाळा ।। १।।  एकं दहं शतं सहस्र गणोबाचे सारे अजस्र अपूर्णांकांची बातच सोडा आकड्याखाली न ये आकडा ।। २।। बेरीज सोपी हातचा अवघड वजाबाकी ही काय भानगड? गुणाकार करी पुरा खुळा भागाकारात शून्य भोपळा ।। ३।। लसावि मसावि काढले कोणी घन, घनमूळ चक्कर आणी काळ-काम-वेग कधी न जुळे कशी चक्रवाढ ते न कळे ।। ४।। गणिताचे सर नवीन हासरे म्हणती शिकूया मिळूनी सारे नको पाठांतर पाया पक्का या गणितासम नसे सखा ।। ५।।

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता , बालसाहित्य

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen