अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० सोमवार, ४ फेब्रुवारी २००८. सहज टीव्ही लावला आणि उत्तर भारतीयांविरुद्ध मुंबईत जोरदार आंदोलन सुरू असल्याची बातमी समोर आली. वेगवेगळ्या माणसांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जात होत्या. आमचा गुन्हा तरी काय? - भयभीत झालेले उत्तर भारतीय विचारत होते. मुंबई फक्त मराठी माणसांचीच आहे का, परप्रांतातल्या दोन कोटी मराठी माणसांवर असे हल्ले झाले तर, यांसारखे प्रश्न उपस्थित केले जात होते. निवेदकाचा स्वर गंभीर होता. याच वेळी पडद्याच्या अध्या भागात प्रत्यक्ष दंगलीची दृश्ये दाखवली जात होती. काचा फुटलेल्या टॅक्स्या, फेरीवाल्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवत असलेले दंगेखोर, काठ्या परजत धावणारे हेल्मेटधारी पोलीस, सायरनचे आवाज, दगडफेक...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .