"सिग्नलवर, पुलाखाली कुणी काही वाटायला, द्यायला आले आणि पळत जाऊन घेतले नाही तर आईबाप मारतात, सगळ्यात जास्त आपल्याला मिळायला हवे म्हणून सणउत्सव काळात आईबाप पोरांना उघडेनागडे ठेवतात. शाळेत सांगतात फुकटचे काही घ्यायचे नाही, पण आमच्यावर हे लादले जाते. लोकांनी दिलेले कपडे आमच्या अंगावर पांघरण्याऐवजी बोहारणीकडे जातात. आम्हाला बिनकपडयाचे, ओंगळवाणे ठेवणे हा एका मोठ्या दारिद्रय नाट्याचा भाग आहे, अशा आशयाचे बरेच काही मुले बोलत राहिली." ठाणे येथील सिग्नल शाळेत प्रकल्प प्रमुख आणि शिक्षक म्हणून कार्यरत आरती पवार – परब यांचा शिक्षणामुळे मुलांमध्ये काय बदल होऊ शकतो, याविषयीचे अनुभव कथन करणारा हा लेख
----------------------------------------
सिग्नल शाळेसमोर तीन अत्यंत महागडया गाडया उभ्या. सोबत कॅमेरे घेतलेले दोन व्यावसायिक फोटोग्राफर. अॅपलपासून ते सोनीपर्यंतच्या महागडया मोबाइलमधील १२ पिक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या फोनकॅमेरामधील सेल्फी आणि फोटोसेशन उत्सुक पंचवीस-तीस सामाजिक बांधिलकीग्रस्तांची दिवाळीजत्रा शाळेसमोर भरली होती. अशात शाळेच्या विद्यार्थ्यांना खेटत मी पुढे जात होते. मनात एकदम शिसारी भरली. उत्सवी आपुलकीने शाळेतील विदयार्थी-पालकांना जवळपास घेरले होते.
हेही वाचलंत का?
सिग्नल शाळा – मुलांकडून शिकताना… (भाग दोन)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी अभ्यास केंद्र , मराठी शाळा , आरती पवार , सिग्नल शाळा , प्रयोगशील शाळा
प्रतिक्रिया
सिग्नल शाळा - भीकदिवाळी आणि निरागसतेचा दीपोत्सव (भाग - तीन)
मराठी प्रथम
आरती पवार - परब
2020-10-08 11:43:39