भाषाविचार - आपला न्यूनगंड (भाग - १०)


विद्यापीठात पेपर काढत बसलो होतो. मुलांना संदर्भ साहित्य म्हणून काय पुस्तकं सुचवावीत याबद्दल बोलणं चाललं होतं. तेव्हा एक ज्येष्ठ सहकारी प्राध्यापिका म्हणाल्या, "तसंही मराठीतून लिहिणाऱ्यांना फार काही येत नाही. त्यामुळे यादीचा काय उपयोग?" मला ते पटलं नाही. आपण लोकांना संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिलं नाही तर लोक लिहिणार कसे? असा माझा प्रश्न होता. पण हा प्रश्न तेवढ्यावर संपत नाही. मराठीतून किंवा इतर देशी भाषांमधून अध्ययन- अध्यापन सामग्री उपलब्ध होत नसेल तर ती कुणी करायची आणि त्यासाठी विद्यापीठीय विचारवंतांवर व इतरांवर काही बंधनं टाकायची की नाही हा खरा प्रश्न आहे. विद्यापीठीय विचारवंत हे साधारणपणे एकभाषिक असतात किंवा तसे राहू इच्छितात. याचं कारण ते सोपं आहे. त्यामुळे देशी भाषांमधून शिकलेले आणि शिकवणारे लोक इंग्रजी वाचण्यालिहिण्याच्या फंदात पडत नाहीत आणि इंग्रजीतून हा व्यवहार करणारे लोक देशी भाषांच्या नादी लागत नाहीत. अपवाद नसतात असं नाही, पण ते नियम सिद्ध करण्यापुरते! पुन्हा या दोन्ही गटांमध्ये छुपी किंवा उघड उतरंड आहेच. म्हणजे इंग्रजी जाणणाऱ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय होता येतं किंवा तसं म्हणता तरी येतं. देशी भाषेत व्यवहार – विशेषत: उच्च शिक्षणावर आधारित व्यवहार करणाऱ्यांना हे भाग्य एकतर लाभत नाही किंवा लाभलंच तर त्यासाठी फार वाट बघावी लागते. याला कारण आहे आपला न्यूनगंड.

हेही वाचलंत का?
भाषिक संचित (भाग - ९)
अन्यायालये? (भाग - ८)

आपण आज आपल्या भाषांधून जे उच्च शिक्षण देतोय ते दुय्यम, तिय्यम दर्जाचं आहे. ते शिळं आहे, त्याला समकालीनतेचा स्पर्शच होत नाही. कारण जे नवं ज्ञान आहे ते आहे इंग्रजीत. जोपर्यंत तुम्हांला तुमची भाषा आणि इंग्रजी दोन्ही उत्तम दर्जाच्या येत नाहीत, ...

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , भाषाभान , उच्च शिक्षण , डॉ. दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र ,

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen