“शेतकऱ्याला घाईगडबडीत ज्या गोष्टी लगोलग हाताशी असाव्यात असं वाटतं, त्या तो वळचणीत खोचून ठेवतो. विळा, कोयता, खुरपं, कुऱ्हाड अशी धारदार हत्यारं या वळचणीत सुरक्षित राहण्याची आणि हवी तेव्हा लगेच सापडण्याची हमी असते. शिवाय, देवादिकांच्या अंगाऱ्या-धुपाऱ्याच्या पुड्या, चैत्रवैशाखात येणारी लग्नाची आमंत्रणं, अशा एकदा काम झाल्यावर बिनमहत्त्वाच्या झालेल्या वस्तूही या वळचणीत वर्ष-वर्ष ठाण मांडून बसतात.” आता विस्मरणात गेलेला पण पारंपारिक घरांचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘वळचणीचे’ महत्त्व सांगतायत साधना गोरे.
समाजातील एखादी परंपरा, जीवनशैली किंवा एखादी वस्तू वापरातून नाहीशी झाली की तिच्याशी संबंधित असलेले शब्दही मागे पडणं, हे ओघाने आलंच. खरंतर अशा शब्दांसाठी हळहळ व्यक्त करून काही उपयोगही नसतो, कारण त्यांचं असं मागे पडणं हे आपण स्वीकारलेल्या राहणीमानाचा अपरिहार्य भाग असतो. अशावेळी आपण एक करू शकतो, या शब्दापासून तयार झालेले लक्ष्यार्थ अधिकाधिक वापरून पुढील पिढ्यांपर्यंत नेऊ शकतो. लक्ष्यार्थ वापरायचे म्हणजे त्या शब्दांशी संबंधित म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर करणं. शब्दाचा लक्ष्यार्थ मूळ अर्थासह आकळला, की त्या शब्दाच्या अंतरंगाचीही ओळख होते, तसतसे ते अधिकाधिक जवळचे वाटायला लागतात. एखाद्या नव्याने ओळख झालेल्या माणसागत आपण या नव्याने ओळख झालेल्या शब्दांच्या नातलगांचीही विचारपूस करत सुटतो; अन् त्यांच्या नात्यातले अनपेक्षित बंध कळले की आपल्याला काहीतरी गवसल्याचा आनंद होतो. या लेखात आपण अशाच एका शब्दाविषयी जाणून घेणार आहोत, तो शब्द म्हणजे वळचण....
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्दवेध
, शब्द व्युत्पत्ती
, शब्दांशी मैत्री
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीछान.
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीउत्तम लेख
Jagadish Palnitkar
4 वर्षांपूर्वीवा!! नेहेमीप्रमाणेच उत्तम लेख!! भाषा आणि संस्कृती कश्या एकमेकींना धरून चालत असतात ह्याची जाणीव होते. 'आढ्याचं पाणी वळचणीला जातं' ह्या उल्लेखावरून एकनाथ महाराजांचा "पाण्याला लागली तहान" हा अभंग आठवला. त्यात "वळचणीचे पाणी आढयाला लागले" असं एकनाथ म्हणतात!! अर्थातच रूपकात्मक पद्धतीनी जीव आणि शिव ह्यांच नातं समजवण्यासाठी तसा उल्लेख आहे. असो.
Vilas Ranade
4 वर्षांपूर्वीचांगला लेख आहे.आमच्या लहानपणी "पावसाच्या धारा येती झरझरा,झाकळले नभ सोसाट्याचा वारा"हि कविता होती. त्या कवितेत "चिमण्या वळचणीत बसती" अशी एक ओळ आहे.
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान - शाळेत शिकवताना या शब्दांचे स्पष्टीकरण आधिक चांगले करता येईल सुंदर लेख .
Subhash Naik
4 वर्षांपूर्वीवळचणीचं पाणी वळचणीला जाणार हे किती लहानपणापासून ऐकत आलो. पण त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने आज कळला तुमच्या लेखामुळे. मनापासून धन्यवाद साधनाताई! - सुभाष नाईक, पुणे 9158911450
उत्तम... भावार्थ कळत असल्याने, वाक्यात उपयोग करत असलो तरी वळचण म्हणजे नक्की काय हे माहितच नव्हते.. या लेखामुळे उलगडा झाला..