शब्दांच्या पाऊलखुणा - सब घोडे बारा टक्के (भाग-३५)


आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये बारा या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व असलेलं दिसतं. वर्षाचे महिने बारा आहेत, ज्योतिषशास्त्रातील राशी बारा आहेत, बारा ज्योतिर्लिंगे आहेत. पांडवांचा वनवास, कुंभपर्व यांच्याशीही बारा संख्या संबंधित आहे. वर्षभरातील सूर्याच्या रूपांना उद्देशून बारा आदित्य म्हटलं जातं. बारा स्वर विविध व्यंजनामध्ये मिसळून तयार होणारी अक्षर मालिका म्हणजे बाराखडी’; सर्व मोसमात उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे बारमाही किंवा बारमासी; अतिशय खोटे बोलणारा मनुष्य – बारजिभ्या; बारा बंद असलेला अंगरखा - बाराबंदी, बारा बलुतेदार; जन्मापासून बाराव्या दिवशी करण्यात येणारा नामकरणाचा विधी – बारसे, मृत्यूनंतर बाराव्या दिवशी करण्यात येणारा विधी – बारावा. इतकंच काय, मानवाने दिवस आणि रात्रीचे विभाजनही बारा-बारा तासात केलं आहे. आपल्या सामाजिक-सांस्कृतिक आचारविचारांमध्ये बाराचे असे कितीतरी समूह दिसून येतात. बारा या शब्दाची व्यूत्पत्ती सांगणारा  साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख- 
२०२१ हे वर्ष आता समाप्तीच्या मार्गावर आहे. डिसेंबर हा वर्षाचा बारावा म्हणजे शेवटचा महिना सरला की नवं वर्ष सुरू होतं. गणितासारख्या विषयात संख्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतंच, पण काही संख्या आपल्या रोजच्या वापरात इतक्या रुजलेल्या असतात, की त्यांचं वेगळं अस्तित्व जाणवतही नाही. अशीच एक संख्या म्हणजे बारा. हिंदू धर्मात तर या संख्येभोवती किती तरी अर्थांचे शब्दप्रयोग पिंगा घालताना दिसतात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बारा , शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Yogesh Bhavsar

      3 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे

  2. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    ज्ञानात नवीन भर पडली.

  3. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    Very interesting information 👍🏻 Thanks for sharing 🙏



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen