'स्वेच्छानिवृत्ती' ही खरोखरच स्वेच्छेने घेतलेली असो अथवा सक्तीने, तिचे साईड इफेक्ट्स असतातच. 'छान आराम करु, कुटुंबासोबत वेळ घालवू' अशा इच्छांना चार-दोन महिन्यांतच वाळवी लागते. माणसाला काळज्या,चिंता असतील तर त्यापायी तो जगण्याचा संघर्ष करत राहतो. परंतु आर्थिक विवंचना नसतील आणि काही कामही नसेल तर रिकामा वेळ खायला उठतो. म्हणूनच काही प्लॅनिंग नसेल, योजना नसतील तर आर्थिक चणचण नसलेली स्वेच्छानिवृत्ती माणसाला अस्वस्थ करते, आजारी करते. पण काही माणसांना नोकरीतले स्थैर्य कंटाळवाणे वाटते आणि ती योजनापूर्व स्वेच्छानिवृत्ती घेतात. चिंतामणी गद्रे हे असेच एक गृहस्थ. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची त्यांनी सागितलेली ही सुरस,रसाळ कथा त्यांच्याच शब्दात.. निवृत्तीचे वयोमान झालेले नसताना ‘भाकरी’ देणारा कामधंदा थांबविणे म्हणजे स्वेच्छानिवृत्ती. बरेच वेळा ही ‘स्वेच्छा’ नसून व्यवस्थापनांनी लादलेली असते. मात्र बँका किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या ठिकाणी स्वेच्छानिवृत्तीमुळे मिळणारे आर्थिक फायदे हे नेहमीच्या पगारापेक्षा जास्त असल्याने खऱ्या ‘अर्थाने’ स्वेच्छानिवृत्ती घेणारेही आढळतात. लादलेल्या निवृत्तीने आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागते. तसेच आर्थिक स्वास्थ्य देणारी स्वेच्छानिवृत्तीही जर रिकाम्या वेळेचे नियोजन केले नसेल तर स्वास्थ्य बिघडवते. पण जर निवृत्ती किंवा स्वेच्छानिविृत्ती नियोजनपूर्वक केलेली असेल तर ती व्यथा न होता एक आनंददायी कथा होते. अशाच माझ्या सुनियोजित स्वेच्छानिवृत्तीची ही कथा. माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे गावातील सर्व जाती-धर्मांतील लोकांनी व नातेवाइकांनी केलेल्या मदतीवर झाले. समाजाने आपल्याला पुढे आणले, मोठे केले; तेव्हा लवकरात लवकर स्थिरस्थावर हो ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
6 वर्षांपूर्वीनियोजनपूर्वक केल्यामुळे छान झाले
asmitaph
6 वर्षांपूर्वीअगदी छान लेख आहे. आता हे गृहस्थ काय करतात ??
raginipant
6 वर्षांपूर्वीफार सुरेख प्रत्येकाने निवृत्ती वा स्वेच्छा निवृत्ती कडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे