पण लताबाईंच्या या हृदयस्पर्शी गायनाच्या आकर्षणाचें मर्म नेमके कशांत आहे ? त्यांत व्यक्त होणाऱ्या व्यथेत ? त्यांच्या निसर्गमधुर आवाजांत ? कीं त्याना मिळालेल्या शास्त्रोक्त गायनाच्या बैठकीत? कीं गीतांतील भाव समजून घेऊन समरसतेनें म्हणण्याच्या पद्धतीत ? की या सर्वच कारणांच्या मिश्रणांत ? असे प्रश्न रसिकांच्या मनांत त्यांचे मोहक संगीत ऐकून उत्पन्न होतात. पण एकच एक निश्चित उत्तर देतां येत नाही. एवढें मात्र खरें कीं तें संगीत फार परिणामकारक असतें. तें ऐकून रसिकांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .