साम्राज्यशाहीची चिकित्सा

अंक – वसंत ऑक्टोबर १९६०

साम्राज्यशाही, भांडवलदारी, हकुमशाही या शब्दांबद्दलही आपल्याला मोठा तिटकारा आहे. लोकशाही व्यवस्थेत या सर्व संस्थांचं दमन होऊन प्रत्येक बाबतीत लोकांच्या हिताचा विचार व्हावा अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काय झालं? लोकशाहीनंही जिल्ह्याजिल्ह्यात नवे संस्थानिक निर्माण केले. साम्राज्यशाही या संकल्पनेचा आणि काही बाबतीत देशातील हवामानाचा आपल्याला कसा राजकीय फायदा झाला याचा आणि जगभरातील साम्राज्यशाहीचा घेतलेला हा अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत आढावा. साठ वर्षांपूर्वी वसंत या मासिकात आलेला हा लेख इतिहासाचं मनन, चिंतन करायला लावतो आणि व्यापक दृष्टिकोन देतो. लेखक दत्तात्रय श्रीधर मराठे (१३ फेब्रुवारी १९०६ – ३ डिसेंबर१९९२) हे जागतिक राजकारणाचे गाढे अभ्यासक. ‘जगाचा इतिहास’, ‘भारत-पाक युद्धविचार’, ‘भारताचे शेजारी’, ‘अमेरिकन काँग्रेस’, ‘चीनच्या प्रचंड भिंतीमागे’ ही मराठे यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके आहेत.

**********

आपण स्वतंत्र होण्यापूर्वी साम्राज्यशाही हा आपल्या दृष्टीने ज्वलंत प्रश्न होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या प्रश्नाची तीव्रता कमी झाली पण साम्राज्यशाहीच्या विरुद्ध आपल्या मनात जी अढी बसली ती काही म्हणण्यासारखी कमी झाली नाही. साम्राज्यशाही वसाहतीतील लोकांचा दर्जा, तद्देशीय लोक आणि वसाहतवाले लोक याचे परस्परसंबंध, लोकांच्या किती पिढ्या एखाद्या देशांत गेल्या म्हणजे त्यांना त्या देशातील लोक समजावयाचे इत्यादी प्रश्नांच्याबद्दल शांत आणि स्थिर मनाने विचार करण्यासारख्या मन:स्थितीमध्ये आपण अद्याप आलो नाही. साम्राज्यशाही धोरण असा शब्द काढला की अजून आपले पित्त खवळते आणि भावनाप्रधान होऊन पुढारीसुद्धा अद्वातद्वा बोलू लागतात. पण शांतपणाने विचार करण्याची वेळ मात्र आलेली आहे.

आता आपण स्वतंत्र झालो आहोत. आपल्यावर राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी पडली आहे. जगातील प्रत्येक घटनेने जर आपण आपले डोके फिरवून घेऊ लागलो तर आपल्या राष्ट्राचे हित पाहण्याचे आपले काम मागे पडेल आणि जग सुधारणे हे तर आपल्या हातून होणारच नाही, कारण ती आपली कुवतच नाही; आपले निष्कारण असे मात्र होईल हे लक्षात ठेवून आपण जागतिक घडामोडींकडे पहावयास शिकले पाहिजे. प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात असे म्हणण्याचा प्रघात पडला आहे. वस्तुत: प्रत्येक प्रश्नाला अनेक बाजू असतात.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.