प्रेमळ, चतुर, विलासी स्त्रीया आणि कपटी, प्रणयी वगैरे पुरुष...

पुनश्च    शशी चौगुले    2020-04-11 06:00:38   

अंक – कल्पना दिवाळी १९५७ साहित्याचा मूळ प्रकार बहुधा संस्कृत भाषेतील काव्यप्रचुर  नाट्यरचना हाच असावा. वास्तवातील व्यक्तिरेखा घेऊन नाट्य फुलवायचे, त्याचा विस्तार करायचा तर समाजात किती प्रकारचे पुरुष, किती प्रकारच्या स्त्रीया असतात हे माहिती असायला हवे.  त्यातही ग्रंथकर्ते बरेचसे पुरुष असल्याने त्यांना स्त्रीयांमध्ये विशेष रस. तेराव्या  किंवा चौदाव्या शतकातील संस्कृत ग्रंथकार भानूभट्ट (यांचे नाव अनेक ठिकाणी भानूदत्त असेही लिहिल्याचे दिसते. कदाचित त्यांचे पूर्ण नाव भानूदत्त भट्ट असे असावे असेही म्हटले जाते.) बनारस परिसरात त्यांचे वास्तव्य असावे. त्यांनी 'रसमंजिरी' आणि 'रसतरंगिणी' या दोन संस्कृत ग्रंथांमधून स्त्रीच्या प्रवृत्ती, पुरुषांचे प्रकार, शृंगार, शृंगारातील रस अशा विषय़ावर अतिशय रसपूर्ण लिखाण केले आहे. 'रसमंजिरी' या ग्रंथातील १४६ प्रकरणांपैकी १०८ प्रकरणे केवळ स्त्रीयांचे प्रकार (त्यांच्या वृत्तीनुसार) सांगण्यात खर्ची घातलेले आहे. या ग्रंथाची सर्वात जूनी छापील आवृत्ती विद्याविलास प्रेस बनारस यांची असून ती १९०४ साली प्रसिद्ध झाली होती. नाट्यात रस कसा निर्माण करावा  हे सांगण्याच्या निमित्ताने त्यांनी  लाजऱ्या, धाडसी, प्रणयी,चोरटे सुख देणाऱ्या स्त्रीया आणि प्रेमळ, कपटी, बाहेरख्याली असे अनेक प्रकारचे पुरुष, सख्या, शृंगार याविषयी लिहिले होते. त्या 'रसमंजिरी' या ग्रंथाचा हा रसाळ परिचय. १९५७ साली  'कल्पना' या दिवाळी अंकात शशी चौगुले यांनी हा परिचय करुन दिला होता. या बहारदार परिचयानंतर मूळ ग्रंथ वाचण्याची उत्सुकता नक्कीच वाढेल. परंतु तो संस्कृतमध्ये आहे. (मूळ शीर्षक) नाट्यलक्ष्य व नाट्यशास्त्र नाट्याचा विचार करतांना त्याची जी प्रमुख अंगे आह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


नाटक रसास्वाद , दीर्घा , कल्पना

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    साधारण



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen