राजघाट

पुनश्च    वा.रा. कांत    2021-07-29 14:00:02   

-आणि मग एकदम आठवते १९४८ च्या ३१ जानेवारीची ती भयानक रात्र ! तेव्हा एका गोळीनं ते हास्य विझून गेलं होतं. घाटावर, जगावर अंधारी रात्र पसरली होती. चंदनी चिता खचली होती. तो तपस्वी देह जळून राख झाला होता. फक्त दोन क्षीण पाय, म्हणजे त्या पायांची गुडघ्यापर्यंतची दोन हार्ड तेवढी अजून जळत होती. (दधीचीच्या अस्थींचा जळता निखारा, शत्रूवर विजय मिळवणारं अमोघ वज्र तो महात्मा त्या मध्यरात्री इंद्राला परत करीत होता.) १९३० साली हेच पाय अगस्तीच्या सामर्थ्यानं दांडीयात्रेला निघाले होते. तेव्हा इंग्रजी सत्तेचा बलसागर भिऊन मागे सरला होता. मिठाचा खडा नि खडा समुद्राला अगस्ती भासत होता. दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी चंपारण्यातून जीवनाच्या महायात्रेला निघालेले हे पाय साऱ्या देशभर हिंडले. कधी थकले नाहीत की कधी थांबले नाहीत. हे चरण राजवाड्यात गेले त्या वेळी सत्ताधीशांचे मुकुटही त्यांच्यापुढं लवले; त्यांच्या तरवारींचं तळपतं पाणी या डोळ्यांच्या कारुण्यगंगेत सरस्वती प्रमाणं लुप्त झालं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen