वरील तहामुळे इतर सुभ्यांप्रमाणें खानदेशांतहि मराठ्यांचे चौथा आणि सरदेशमुखीचे हक्क चालू झाले. आणि त्यांनी ठिकठिकाणी आपले कमाविसदार नेमले. यापूर्वीच कितीतरी वर्षे आधीपासून मराठ्यांनी खानदेशावर स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली होती.. औरंगजेबाच्या हयातीतच नेमाजी शिंदे, परसोजी भोंसले इत्यादि सरदार खानदेशांत वावरत होते. इ. स. १७०३ मध्ये नेमाजी शिंदे आणि परसोजी भोसले यांनी तीस हजार स्वारांनिशी बु-हाणपुरला वेढा घालून शहराचे बाहेरचे पुरे जाळून फस्त केले. या नंतरच्या काळांत खंडेराव दाभाडे यानें खानदेशाच्या सरहद्दीवर सोनगढ येथें आपले ठाणे देऊन दक्षिण गुजरातेला शह देण्यास सुरुवात केली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .