परंतु रागदारी संगीत प्रेक्षकांना जसजस जास्त आवडूं लागलें तसतशा नाटकांत गायला (ताना मारायला ) योग्य अशा रागदारी रसील्या चिजा पुरविणाऱ्या गवयांचा प्रवेश नाटकमंडळ्यांत होऊं लागला, टेंबे चाली पुरवतां पुरवतां स्वतःच गायक नट म्हणून गंधर्वांबरोबर भूमिका करू लागले. मागोमाग भास्करराव बखले हे गवई म्हणून या क्षेत्रांत आले. त्यांनीं विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी नाटकांत चाली घातल्या. स्वयंवराचे पूर्वी त्यांनीं ख्याल गायनाची तालीम बालगंधर्वांना दिली. स्वयंवरांतील चिजांची तालीम अगोदर देऊन नंतर मग त्यावरील पदांची दिली. प्रत्येक पद प्रथम विलंबित लयींत ख्याल अंगानें अस्ताई अंग भरून गायलें जाई, नंतर बढत सुरू होई.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .