अंक:- किर्लोस्कर ; वर्ष :- फेब्रुवारी १९९२ जगातील सगळ्या वास्तूंची आणि वस्तूंची एक आयुर्मर्यादा ठरलेली असते. कधी कधी तर ती मर्यादा संपण्याआधीच आपण त्यांना निरुपयोगी म्हणून टाकून देतो. पण माणसांच्या बाबतीत असं घडत नाही. इच्छामरणाबाबत मांडलेले हे विचार मुद्दाम चर्चेसाठी वाचकांसमोर ठेवले आहेत. दचकलात ना, शीर्षकच तसं आहे. नुसतं वाचून अस्वस्थ झाला असाल. कदाचित, दैनंदिन जीवनात घडीघडीला, आजूबाजूला घडलेला मृत्यू पाहिला असला की यात काय मोठा शोध लावलाय, असा विचार करून मृत्यूसंबंधीचे विचार झुरळासारखे झटकूनही टाकाल माझे हे व्याख्यान. पण थोडासा विचार केलात तर पटेलही मी काय म्हणतोय ते. सुप्रसिद्ध उर्दू कवी उमर खय्याम याने आपल्या असंख्य रुबायांपैकी एकात फार मोठा अस्वस्थ करणारा विचार मांडलाय. तो म्हणतो, जन्माला येणं माझ्या अधीन असतं तर मी जन्मालाच आलो नसतो आणि जन्माला आल्यानंतर मरण माझ्या हाती असतं तर मी मेलोच नसतो. आता हे सारं कशासाठी, असा विचार आला असेल तुमच्या मनात. तर सांगायचा मुद्दा असा की दररोज सकाळी दूरदर्शनवर भारताची लोकसंख्या दर सेकंदाला किती वाढतेय याची टोंचणी प्रसार-माध्यमांवरून केली जाते. असंख्य प्रेक्षक ते पाहतात आणि “आपल्याला काय त्याचे” किंवा “पण लक्षात कोण घेतो” या बेफिकीर प्रवृत्तीने आपल्या रोजच्या रहाटगाडग्यांत लाखोंच्या गर्दीत खचलेल्या मनाने आणि आंबट-ओशट स्वप्नाने वावरतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
चिंतन
, समाजकारण
, किर्लोस्कर
SuchetaGokhale
7 वर्षांपूर्वीविचार मांडणी नेमकेपणाने व्हायला हवी होती.
aghaisas
7 वर्षांपूर्वीविषय चांगला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे. लेखाची सुरुवात भरकटली आणि नंतर फारसे मुद्दे न मांडताच लेख संपला असे वाटले