इतिहासकालीन संस्कृती- संगीत केंद्रांच्या शोधात असताना मला माझ्या शेजारीच असलेल्या अहमदनगर मधल्या फराह बागचा शोध लागला. राजांच्या, सुलतानांच्या भव्य महालांमध्ये कुठे बरं गाणे होत असेल असा विचार माझ्या मनात नेहमी यायचा. जमीनदारांची, मनसबदारांची झुंबरे असलेले दिवाणखाने. चीकाचे पडदे, लोड, गाद्या अशी अनेक चित्रे फोटोंमध्ये आणि सिनेमा मधून पाहिली होती. नंतर मोठमोठे राजवाडे पण पाहिले पण खास काव्य संगीतासाठी बनवलेली वास्तू मला फराह बागेच्या रूपाने पहिल्यांदाच पहायला मिळाली.
हुसेन निजामशहा हा अहमद निजामशाहीचा कर्तबगार सुलतान होता. त्याला संगीत कलेची आवड होती. त्याची मुलं चांद सुलताना आणि मुर्तझा निजाम शाह दोघांनाही संगीत प्रिय होते. दोघेही तंबूर वाद्य वाजवायचे. मुर्तझा शहाने आपल्या भव्य महालामध्ये फराह बागेची रचना केली. तळ्याच्या मधोमध असलेले सांस्कृतिक केंद्र त्याकाळी उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण होते. आजूबाजूला आंब्यांची झाडे, त्याला लगडलेले आंबे, आणि तीनमजली वास्तूची भव्यता, त्यावेळी डोळ्यात ठरत नसेल. वास्तूची भव्य गवाक्षे, जी आतल्या बाजूने छोटी आणि बाहेरच्या बाजूने मोठी आहेत. ती कर्ण्याचे काम करायची. म्हणजे आतला आवाज amplify होऊन बाहेर जायचा आणि बाहेरची गरम हवा गाळून आत यायची.
या शिवाय छताला false ceiling देखील आहेत. अख्खा एक माणूस गुडघ्यावर उभा राहू शकतो एवढी दोन स्तरांमध्ये मोकळी जागा आहे. वातानुकुलीत यंत्रणेचे पारंपारिक उदाहरण माझ्या समोर होते, या वास्तूच्या दोन्ही बाजूने सहज दिसणार नाहीत असे जिने आहेत. महिलांसाठी खास बनवले होते. म्हणजे त्या या जीन्यानी वरच्या मजल्यावर जाऊन खालच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायच्या. वास्तूत शिरल्यावर छोटी कारंज्याची जागा आणि फरशीत वितळलेल्या काचेची पेरणी ! संध्याकाळी जेव्हा मशाली पेटायच्या, सुलतान मुर्तजा आणि चांद सुलताना दिल्लीहून आलेल्या फतेह शाहचे गाणे ऐकत आपली करमणूक करायचे, तेव्हा या वास्तूची शोभा काय असेल ! संस्कृती केंद्राचे इतके सुंदर रूप बघून मी त्या सुलतानाच्या रसिकतेला दाद दिली आणि संगीताच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन घडल्याचा आनंद मनापसून घेतला.
**********
लेखिका- अंजली मालकर
फराह बाग - अहमदनगर स्थापनेच्या निमित्ताने
निवडक सोशल मिडीया
अंजली मालकर
2021-08-01 14:00:02

प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

कला-साधना 'राजमान्य' होते
अज्ञात | 2 दिवसांपूर्वी
काव्याचा निष्ठावंत अभ्यासक म्हणून डे प्रसिद्ध आहेत.
गांधीजी आणि पितृत्व
प्रभाकर दिवाण | 5 दिवसांपूर्वी
गांधीजींचा लहान मुलगा खाण्याचा विलक्षण हट्ट घेऊन बसायचा.
माझ्या अभिनेत्री कन्यका
शोभना समर्थ | 2 आठवड्या पूर्वी
नूतनच्या या यशावर तनुजाचें यश पडताळून पाहणं आज तरी इष्ट ठरणार नाहीं
रहस्यनिरीक्षण
महादेव मल्हार जोशी | 2 आठवड्या पूर्वी
तुम्हांला ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला आहे काय ?
bookworm
6 वर्षांपूर्वीछानच! वास्तू कोणत्या काळातली आहे हे समजलं नाही पण भेट द्यायला नक्की आवडेल.