"दहावीची बॅच"ही कविता कोणी लिहिलीय माहीत नाही , पण ती प्रत्येकाची 'मनकी बात' तर नाही ना?
"दहावीची बॅच"
प्रत्येकाची दहावीची बॅच असते
कोण कुठे आहे माहिती नसलं
कधीच भेटणं होत नसलं
तरी ती प्रत्येकाच्या मनात असते
दहावीच्या बॅचची एक गंमत असते
पन्नाशी पार केलेला तो सासरा झालेला असतो,
पन्नाशी पार झालेली ती सासू झालेली असते,
तरी सुद्धा दहावीच्या बॅचमध्ये अजुनही तो मुलगा असतो आणि ती मुलगी असते
दहावीच्या बॅचमधल्या आठवणी
सुखद असते त्यांची उजळणी
तीने त्याच्याकडे पाहिलेलं असतं
त्याने तीच्याकडे पाहिलेलं असतं
बस्स इतकच,
बघण्या बघण्यातच वर्ष सरलेलं असतं
दहावीचा निकाल लागतो,
नवीन प्रभा घेऊन सूर्य उगवतो
प्रत्येकाचं विश्व वेगळं होतं,
त्याचे मित्र बदलतात
तीचेही मित्र बदलतात
एका गोष्टीची सुरूवात होण्यापुर्वीच
तिला विराम येतो
नवीन वयात, नवीन विश्वात,
नवीन मित्रांत, गप्पांच्या ओघात,
पुसटशा स्पर्शात,
प्रेम म्हणजे काय समजू लागलेलं असतं
आता ओढही असते आणि सहवासही असतो
त्याला कुणीतरी आवडते
तीला कुणीतरी आवडतो ,
कुणी सहजीवनाची शिडी एकत्र चढतो,
कुणी पडतो, कुणी धडपडतो
पुढच्या आयुष्यात
प्रत्येकाची आपली बाग असते
त्याच्या बागेत तो झाड होऊन जगतो,
तीच्या बागेत ती वेल होऊन जगते
वेलीवर कळ्या येतात त्यांची फुले होतात
झाडाचा वृक्ष होतो सावली देत ताठ उभा असतो
पण त्या उभं रहाण्यातही खरं तर वेलीचाच त्याला आधार असतो
वर्ष सरत असतात,
कळ्यांची फुले होतात
वाऱ्यावर डुलत असतात बहरत असतात
कधी वाऱ्याचं वादळही होतं
सगळ्या बागेला हलऊन जातं
झाड मात्र ताठ असतं,
कसं हलल पण नाही म्हणून ताठरपणे पहात असतं
पण तीच ती वेल असते
स्वतः वाकते म्हणून झाडाला मोडण्यापासुन वाचवते
आता आयुष्याच्या सायंकाळी
फेसबुक व्हाट्सॲप् हाच विरंगुळा असतो !
फेसबुकवर शोध घेता घेता
व्हाट्सॲपवर दहावीच्या बॅचचा ग्रुप तयार होतो
इतकी वर्षे बंद असलेला कोनाडा हळूच उघडतो
हृदयाच्या कुपीत बंद ठेवलेल्या अत्तराचा सुगंध अजुनही तसाच असतो
आता मात्र गप्पांच्या मैफिलीत
जुन्या मित्र मैत्रीणींच्या आठवणींना उजाळा येतो
कारण त्या अत्तराच्या कुपितला सुगंध पुन्हा हवाहवासा वाटतो
मनोमन मन म्हणत असतं
अशी वेळ यावी
केव्हातरी कुठेतरी ती ओझरती तरी दिसावी
तेव्हाची ती नजरानजर एकदा तरी व्हावी,
ती एकच नजर
पुढील जीवनाची शिदोरी बनुन जावी
त्यातच एक आशेचा किरण दिसतो
दहावीच्या बॕचचा भेटण्याचा दिवस ठरतो
त्या दिवशी प्रत्येकजण
नव्यानं जुनंच दिसण्याचा प्रयत्न करतो
प्रत्येक मुलगा मुलगी मला ओळखेल हा भाबडा विश्वास असतो
त्याच वर्गात, त्याच बेंचवर
प्रत्येकजण पुन्हा एकदा बसणार असतो
आणि आठवणींच्या झऱ्यांचा महासागर होणार असतो
भेटीगाठी होत असतात जुन्या आठवणी निघत असतात
त्यातच तीची त्याची नजरानजर होते
आणि एका क्षणात सर्व काही सांगून जाते
त्याला आणि तीलाही
नवीन भेटीत खुप काही बोलायचं असतं
पण उजाळा देण्यासारख
दहावीच्या वर्षात काही घडलेलच नसतं
तो तीला तिच्या टोपण नावाने हाक मारतो,
ती अवघडते पण आक्षेपही नसतो
कारण एकच दिवसाचा सहवासही
पुढच्या संपूर्ण प्रवासाचा साथी होणार असतो
निरोप घ्यायची वेळ येते
दोन समांतर रेषा काही क्षणांकरता एकत्र होऊन
पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात
पुढील जन्मी नक्की भेटण्याची
नजरेनेच ग्वाही देतात
हीच ती दहावीची बॅच
कायमचं घर करून रहाते
आयुष्याच्या भैरवीला
साथीला गात रहाते ... दहावीची बैच.......................
दहावीची बॅच
निवडक सोशल मिडीया
संकलन
2018-01-08 10:03:22
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीमन मोकळं झाल.
Vijay Gurav
4 वर्षांपूर्वीमाझी दहावी होऊन ३५ वर्षे झाली पण कविता वाचून नकळत माझ्या शाळेत जाऊन आलो. कित्येक वर्षे न आठवलेल्या गोष्ठी आठवल्या. सुंदर कविता...
Balasaheb More
4 वर्षांपूर्वीएकदम छान भारीच
Vilas15
5 वर्षांपूर्वीkharach hi pratekachi man ki baat ch aahe
Prabha Salwekar
7 वर्षांपूर्वीमस्तच. पण हा अनुभव प्री. डीग्री बॅचचा कारण ११ वी पर्यंत कन्याशाळा
Parvani
7 वर्षांपूर्वीमस्तच पुन्हा दहावीत असल्यासारखे वाटले
Aparna
7 वर्षांपूर्वीMastach....
भागवत फिरके
7 वर्षांपूर्वीअक्षरशः मनातलेच विचार। मात्र आमची 11वीचीच ब्याच होती।विचार तेच।मस्त।
kushal2007
7 वर्षांपूर्वीव्वा एकदम छान
vbakkar
7 वर्षांपूर्वीKhupach chhan, kharokharach kunihi relate hou shakel ashi kavita.
Kiran Joshi
7 वर्षांपूर्वीWa...chhan Kavita...mala matra dahavila evadha velhi milala nahi...!
jyoti
7 वर्षांपूर्वीkhupach mast june diwas aathavale........................
aparna kelkar
7 वर्षांपूर्वीव्वा एकदम छान