वयाच्या ४५/ ५५ / ६५ नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी १२ नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील. हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.
१) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. हे पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते. धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचित तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामुळे या वयात गुंतवणुक करू नये.
२) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजिबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
३) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमितपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमित औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
४) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तू व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा एन्जॉय करणे कठीण असते.
५) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणाऱ्या आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वांत महत्वाचा आहे. त्यामुळे भूतकाळातील वाईट आठवणींमुळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.
६) तुमचे वय काहीही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
७) स्वतःविषयी अभिमान बाळगा. तो अंतरबाह्य असु दे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले राहाल तेवढे आतून समाधानी असाल.
८) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
९) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचित तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड राहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
१०) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचित तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागितले तरच. उगीचच्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
११) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजिबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामुळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
१२) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामुळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..
असेच लेख कायम वाचायचे असतील तर या ब्लॉग ला फॉलो करा.
image credit- masterfile.com
Google Key Words - जीवनशैली , वृद्धत्वाचे नियोजन, Old-age tips, Happy old-age.
पंचेचाळीशीनंतरची पथ्य
निवडक सोशल मिडीया
संकलन
2017-09-13 06:18:22
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीमनाला दिलासा आणि दिशा मिळाली . आवडले .
संतोष
6 वर्षांपूर्वीमस्तच ?
प्रसाद सं.
6 वर्षांपूर्वीबऱ्याचशा गोष्टी माहीत असूनही पुन्हा इथे वाचताना बरं वाटलं. प्रयत्न करण्यास उद्युक्त करणारे मुद्दे आहेत. धन्यवाद आणि शुभेच्छा... ?
6 वर्षांपूर्वी
खूप छान व उपयुक्त लेख
shripad
6 वर्षांपूर्वीउत्तम सूचना.
swapnakatdare
7 वर्षांपूर्वीछान लेख
prakash.joshi
7 वर्षांपूर्वीAbsolutely right! Although people would never realise this . Mastraam vhyalaa Shila.
Devendra
7 वर्षांपूर्वीछान
प्रकाश हिर्लेकर
7 वर्षांपूर्वी45 नंतरची पथ्ये कालानुरूप आहेत.60 व त्यावरचे नववृद्धांसाठी मार्गदर्शक अशी ती आहेत.भा.ल. महाबळ छान लिहितात.त्यांचा लेख वाचायला आवडेल.आगे बढो.
Sureesh S Johari
7 वर्षांपूर्वीखूप छान व उपयुक्त लेख
Anant Javkhedkar
7 वर्षांपूर्वीलेख अत्यंत उपयुक्त आहे.
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीमला ९१५२२५५२३५ या नंबर वर whatsapp करा. मी सांगतो काय करायचे ते ...
Shabdangan
7 वर्षांपूर्वीMala paise bharun sabhasad vhaychay. Pan adchani yetahet. Mandatory habit.
vrudeepak
7 वर्षांपूर्वीअतिशय उत्तम लेख. परमार्थप्राप्ती बद्दल एक सूचना लेखात यायला हवी होती असे वाटते. अर्थात ते वैयक्तिक आवडीवर अवलंबून आहे.
Sudhirshinde
7 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर आहे
sudhirdnaik
7 वर्षांपूर्वीI am so happy that I decided to become a member! 2018-19 has really begun well. Two of my resolutions that I have so far succeeded with are: 1. I will start (and end) the year by "giving". In March I contributed to a Child's heart operation and in April to an orphanage 2. I will enjoy what I have always enjoyed - Good Marathi movies, Marathi plays and thought provoking articles. 3. Thanking God for solving my intricate problems. I now regularly visit Swami's math in Lokhandwala Thank you for helping me with the second resolution. Hopefully you will keep updating the platform with more and more enriching articles. Hopefully your articles will inspire me, guide me and help me with my 4th, 5th and 6th resolutions - 4.To popularise and promote 'Ichhamaran" 5. "Organ Donations" 6. Help Conflict resolutions through Arbitration and Conciliation This is a GREAT INITIATIVE. All the best to you Mr Bhide. God bless you!!! Sudhir Naik Samhita Social Ventures
Nitin wanna mandlik
7 वर्षांपूर्वीVery nice
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीpaytm ने करू शकता. ९८२१०१४७१६ या नंबर वर तुम्ही १०० रुपये पाठवू शकता.
Pradyumna Godbole
7 वर्षांपूर्वीWhy PayTM is not included in Wallets, I have only PayTM.
Pravin saraf
7 वर्षांपूर्वीKhup chan ???
madhao sarpatwar
7 वर्षांपूर्वीlekh aawadala. atishay upauktt Mahiti.
ABHAYD
7 वर्षांपूर्वीSorry, I am not used to Marathi tying. Nice. I am sure that "do not do investment' is in order. Do you mean in equity/shares? Then Yes, after 55-60, one can start transferring it to debt( FD, Debt mutual funds, Postal schemes etc) whenever market has risen. Even Annuity, PF needs to be invested. Today there are many options and one needs to take proper advice and invest. Another point, spend some time to help needy and poor-- spend money, efforts and time. Let your skills be useful to the society. Nothing like spending 12-14 hrs a week in a good NGO.
रत्नावली सुनिल घोगरदरे
7 वर्षांपूर्वीमनाला खूप छान वाटले.वाचून आनंद झाला.
सुबोध
7 वर्षांपूर्वीहा लेख मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन मराठी माणसासाठी लिहिला आहे. त्या संदर्भात तो उपयुक्तच आहे . धन्यवाद.
मात्र, जगभरात व त्यातही विकसित देशांमधे, मध्यमवयीन लोकांसाठी इतरही काही जीवनशैली शक्य आहेत ह्याची दखल घेणारा एखादा मुद्दाही ह्या लेखात हवा होता.
पन्नास वर्षांची व्यक्ती पंचवीस वर्षांचा जोडीदार निवडून लग्न करते. ते लग्न आठ-दहा वर्षे टिकते. अशा व्यक्ती मात्र सत्तर,पंचाहत्तर वर्षे निरोगी आयुष्य जगतात.
एखादी व्यक्ती पन्नासाव्या वर्षी नवीन उद्योग विचारपूर्वक सुरू करते किंवा एखादी समस्या सोडवायला काम करू लागते.
युरोपी-अमेरिकन संस्कृतीतील पोशाख व खानपान स्विकारतानाच अशा जीवनशैलीदेखील मराठी मध्यमवर्गाने स्विकारल्या पाहिजेत.
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीतीच तर गंमत आहे शब्दाची...
G G Kakade
7 वर्षांपूर्वीपथ्य म्हटल्यानंतर मला वाटलं ,औषधांचा मारा असेल पण हा तर सुखी जीवनाचा महामंत्र आहे.
Anagha Wadekar
7 वर्षांपूर्वीखरं आहे