fbpx

संपादकीय – गणिताची सोपी भाषा आणि भाषेचे बिघडलेले गणित

मराठी ही अर्थार्जनाची, प्रगत व्यवहाराची भाषा नसल्याने तिला सामाजिक प्रतिष्ठा नाही. त्यामुळे ती शिकण्याशिकवण्याविषयीच समाजामध्ये उदासीनता आहे. परिणामी, मराठी समाजाची भाषिक क्षमता पिढीगणिक वाढण्याऐवजी कमी कमी होत चालली आहे. सामाजिक, आर्थिक मागासलेपणा पूर्वीही होता. निरक्षरतेचे प्रमाण आजच्या पेक्षाही जास्त होते. प्रमाण मराठीची जडणघडण होण्याच्या काळात प्रादेशिक बोलींतूनच व्यवहार होत होता. तरीही ती शिकण्याच्या प्रबळ प्रेरणेमुळे तिचे सार्वत्रिकीकरण होत गेले. आता तर आधुनिक तंत्रज्ञानानमुळे भाषाशिक्षणात मुलांना येणाऱ्या अडचणींवर मात करणे तुलनेने अधिक सोपे झाले आहे. विषयाच्या काठिण्याचे खापर भाषेवर फोडण्यापेक्षा प्रगत अध्ययनसामग्री व विद्यार्थिकेंद्री अध्यापनपद्धती यांचा अवलंब  करणे हेच खरे खात्रीचे व प्रचलित मार्ग आहेत. ज्या आदिवासी, कष्टकरी, मागासलेल्या समाजातील मुले आज डॉक्टर, इंजिनीयर झालेली आपण पाहातो त्याच समाजातील मुलांना आज एकवीस, त्रेसष्ट हे संख्यावाचन अवघड जात असेल तर त्याची कारणे भाषेबाहेर शोधली पाहिजेत… (पुढे वाचा)

—————————————————————————————————————————————–

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

  1. खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण ! लेख मराठी भाषेबद्दल ,तिच्या प्रकृतीबद्दल जाणून घेणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.

  2. Right.

  3. मराठी भाषेतील लाघव जपलेच पाहिजे. त्यामुळे द्वीअंकी संख्या उच्चारण्याची प्रचलित पद्धतच योग्य हे सप्रमाण पटवून दिले या लेखाने.

Leave a Reply

Close Menu