एखादी भाषा अस्तंगत का आणि कशी होते याचे प्रकरणअभ्यास खूप उपलब्ध आहेत. सिंधी भाषा ही भारतीयांसाठी जवळची भाषा, पण ती आज अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत सिंधी भाषेचा समावेश असला तरी भारतात ती कुठल्याच प्रदेशाची राजभाषा नाही. विविध कारणांमुळे आपल्या नजरेसमोर ही भाषा आचके देताना दिसते आहे. भाषेला स्वतःचा स्वतंत्र भूप्रदेश व एकक्षेत्री भाषकसमाज नसणे हे सिंधी भाषेच्या ऱ्हासाचे मुख्य कारण आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर विखुरलेला सिंधी समाज आपल्या भाषेचा वारसा पुढल्या पिढ्यांकडे सोपवण्यात कमी पडला. सिंधी माध्यमाच्या शाळाच राहिल्या नाहीत तर भाषेचं व्यवहारसातत्य कसे टिकणार? थोडीफार साहित्यनिर्मिती सोडली तर ह्या भाषेतील नाट्यचित्रपटनिर्मिती जवळपास थांबली आहे. भाषा टिकवण्याचे प्रयत्नही क्षीण आहेत. काय आहे सिंधी भाषेचे भारतातील वास्तव? काय आहे तिचे भवितव्य? सांगताहेत, ज्येष्ठ भाषाभ्यासक प्रा. अविनाश बिनीवाले... (पुढे वाचा)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------१९४७ च्या भारताच्या फाळणीत संपूर्ण सिंध प्रांत पाकिस्तानात गेला, त्यामुळे काही लाख सिंधी भाषिक हिंदूधर्मीय निराश्रित, निर्वासित म्हणून भारतात आश्रयाला आले. हे निर्वासित मुख्यतः सिंधला लागून असलेल्या, जवळच्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात नि महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये आले नि हळूहळू त्यातले बहुसंख्य तिथेच स्थिरावले. (एके काळी अख्खा सिंध प्रांत मुंब ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
6 वर्षांपूर्वीखूपच उद्बोधक आहे हा लेख. सिंधी भाषेत अंतश्वसित स्वन असतात, असे वाचले आहे परंतु प्रत्यक्ष वापर कसा करतात ते सांगणाराह सिंधी भाषक मला अजूनही भेटलेला नाही. रेल्वेत एक महिला भेटली होती परंतु मी काय म्हणते हे तिला कळत नव्हते.