मातृभाषा हीच शिक्षणाची माध्यमभाषा असली पाहिजे हे तत्त्व म्हणून सर्वच पालकांना मान्य असले तरी सर्वच पालक त्या तत्त्वाचे पालन म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवतात असे नाही. किंबहुना, बहुतेक पालक इंग्रजी माध्यमाची शाळा पसंत करतात. कारण काय, तर काळाची गरज. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. मराठी शिकून करायचे काय हाही एक विचार त्यामागे असतो. पण तत्त्वाप्रमाणे व्यववहार करणारे पालक नसतातच असे नाही. आपल्या मुलांना विचारपूर्वक व निग्रहपूर्वक मराठी शाळेत पाठवणारे पालकही समाजात असतात. त्यांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी नसते का ? थोडी अधिकच असते. आपले मूल मातृभाषेतून शिकले तरच त्याची सर्वांगीण प्रगती होऊ शकते यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळेच प्रवाहाविरुद्ध जाऊन ते मराठी शाळेची निवड करतात. अभिनेत्री चिन्मयी सुमीत ह्या अशाच सुजाण पालकांपैकी एक असून त्या मराठी अभ्यास केंद्राच्या मराठी शाळांसाठी कार्यरत ‘मराठीप्रेमी पालक महासंघा’च्या सदिच्छादूत आहेत. आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवण्यामागे त्यांचा काय विचार होता हे सांगणारे त्यांचे हे मनोगत -
-----------------------------------------------------
मी माझ्या मुलाला मराठी माध्यमात घालायचा निर्णय घेतला, तो निर्णय असा नव्हताच. माझ्यासाठी ती अत्यंत नैसर्गिक गोष्ट होती. माझ्या मुलांनी शाळेत जायचं तर ते मराठीत, इतकं ते माझ्यासाठी नैसर्गिक होतं. पण जेव्हा घरात, इतरांकडून अशा प्रतिक्रिया आल्या की, 'असा कसा तुम्ही निर्ण ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Prakash Hirlekar
6 वर्षांपूर्वीमी 1975 चा मुम्बई विद्यापीठा चा पदवीधर.ततपूर्वी छबीलदास चा विद्यार्थी. जातिवन्त दादरची मध्यमवर्गीय (तेंव्हा कनिष्ठ,उच्च असे प्रकार नव्हते) शाळा.1976 ते 78 बॉम्बे टेलीफ़ोन नंतर 1978 पासून मंत्रालयात सहाय्यक म्हणून रुजू होऊन 2011 मध्ये सहसचिव पदावरुन सेवानिवृत्त.मुलाला ठाण्यात मराठी माध्यमात. अभियन्ता होऊन परदेशात. त्यामुळे माझ्या भावन्डानी त्यांच्या मुलानाही मराठी माध्यमातून शिकवले. त्यांचेही व्यवस्थित पर पडले.आपण उगाचच इंग्रजीचा बड़ेजाव माजवतो.
[email protected]
6 वर्षांपूर्वीमी माझ्या मुलाला मराठी माध्यमात टाकले आहे.सध्या तो पहिलीत आहे.आत्ताच प्रवेश घेतला. तो घेऊन महिना झाला तेव्हापासून शाळेतल्या बाई,मुख्याध्यापिका मला मध्ये मध्ये सतत प्रश्न विचारतात की 'तुम्हाला खरंच मराठी माध्यमात टाकायचे आहे का ? ' मी दर वेळेला 'हो ' असे म्हणतो तरी पुन्हा काही दिवसानंतर हाच प्रश्न पुन्हा त्यांच्याकडून येत आहे.शिवाय मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तेथील 99.99 % प्राध्यापकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात टाकली आहेत.त्यांच्याकडूनही येणाऱ्या अशाच प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते.त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना मराठी माध्यमात टाकल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या दिव्यांना सामोरे जावे लागले असेल हे मला जाणवतंय. तुमची मुलाखत पूर्वी ऐकली होती त्यातील मातृभाषा शिक्षणाचे तुम्ही सांगितलेले महत्त्व व ते सांगतानाची तुमची पोटतिडीक विशेष भावली होती.आजचा या लेखातील मातृभाषा शिक्षणाचा विचार मौलिक तर आहेच ,पण तुमच्यासारख्या सेलिब्रेटी असलेल्या व्यक्तीने विवेकानं असा निर्णय घेणं फारच दुर्मीळ आहे. शिवाय तुमचे अनुभव व दाखले मला ह्याबाबतीत उभारी देणारे आहेत. धन्यवाद !? -प्रा.प्रदीप पाटील,वसई