fbpx

दुकानजत्रा

“हाताने करण्याचे एखादे काम बुद्धी वापरून, मनःपूर्वक लक्ष घालून उत्तम साकार करण्यातला आनंद, चिकाटी, तसेच गटाने काम करताना एकमेकांशी जुळवून घेत सहकार्याचा अनुभव मुले घेतात. विक्री करताना पटापट तोंडी हिशोब करणे, वस्तूंची वैशिष्ट्ये सांगता येणे, ग्राहकांशी न संकोचता सौजन्याने संवाद करणे, दुकानजत्रेच्या शेवटी सगळा आर्थिक हिशोब न कंटाळता चोख लावणे ह्या गोष्टी मुले शिकतात.” पुणे येथील ‘अक्षरनंदन’ शाळेतील शिक्षक गौरी देशमुख ‘दुकानजत्रा’ या उपक्रमाविषयी सांगतायत – 

—————————————————————————————-

शाळेच्या इमारतीत मधल्या मोकळ्या जागेत तशीच वरच्या चार वर्गखोल्यांमध्येही दुकानजत्रेची मांडामांड चालू आहे. एक किंवा दोन ताईदादा आणि ५ ते ६ मुले असा गट टेबले मांडून-जोडून त्यावर त्यांच्याकडे असलेल्या विविध वस्तू नीटनेटक्या रीतीने मांडतोय. मागच्या भिंतीवर नमुना वस्तूंनी आणि मुलांनीच बनवलेल्या आकर्षक जाहिरातींनी सजावट सुरू आहे. कुपने, सुटे पैसे, खजिनदार आणि विकेते सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या आहेत आणि शाळेची घंटा वाजते… टण् टण्

दुकानजत्रा सुरू झाली! शाळेच्या दरवाज्याशी आधीपासून येऊन थांबलेले पालक आणि मंडळी उत्साहाने आत आलेत. त्यांना येताना बरोबर सुटे पैसे आणायचे व कापडी पिशवी आणायचे आवाहन आधीच केलेले आहे. रांगा लावून मुलांनी केलेल्या गोष्टी ते आवडीने विकत घेताहेत. मुलांना प्रोत्साहन देताहेत. मुलांची थोडी धांदल उडाली आहे. आपल्या सगळ्या वस्तू संपतील ना अशी हुरहुर काही जणांना, तर काहींना आपली आई किंवा बाबा अजून कसे आले नाहीत याची चिंता वाटतेय. पालक मंडळी दुकान जत्रेतला खाऊ खाता खाता आपापल्यात भेटताहेत, गप्पा गोष्टी करताहेत. आणखी पालक येताहेत, वस्तू संपत चालल्या आहेत. कदाचित शेवटचा

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. वा: फारच छान!!चांगला उपक्रम!!

Leave a Reply

Close Menu