‘घट’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे मातीचे भांडे. घडा, घागर, मडके, गाडगे, कलश, माठ, डेरा हीही त्याची रूपे ऐकायला मिळतात. तसेच घटस्थापना, घटका, घटस्फोट, घटपट या शब्दांतही 'घट' शब्द आहे. शिवाय नुकसान, तूट या अर्थानेही मराठीत 'घट' शब्द वापरला जातो. या सर्व रूपांतील 'घट' शब्दाचा अर्थ एकच की वेगवगेगळा? चला, जाणून घेऊ या...!-------------------------------------------------
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते अन् मग नवरात्रीत घटाची आरास केली जाते. दशमीला सीमोल्लंघन करून, एकमेकांना आपट्याची पानं देऊन ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा’ अशी आर्जवं करून महाराष्ट्राच्या घराघरांतून दसरा साजरा केला जातो. भारतातील बहुतांश राज्यांत दसरा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात असला तरी देवीची उपासना हा त्यातील समान धागा आहे. आपल्याकडे घटस्थापना करून धान्य उगवून आणले जाते हे एक प्रकारे मातीच्या - निसर्गाच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. स्त्री-सर्जनाच्या नऊ महिन्यांचे प्रतीक म्हणूनही ‘नवरात्री’ हे अत्यंत सूचक प्रतीक म्हटले पाहिजे. केवळ दसऱ्या सणापुरतेच नव्हे, तर मातीचे अन् त्यापासून बनलेल्या घटाचे आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.
हेही वाचलंत का?
शब्दांच्या पाऊलखुणा – केरसुणीला किनखापाची गवसणी (भाग – सतरा)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी अभ्यास केंद्र
, शब्दव्युत्पत्ती
, साधना गोरे
, घटस्थापना
, नवरात्री
rsanjay96
5 वर्षांपूर्वीसुंदर माहिती मिळाली.