‘राम’ शब्दाचं स्पेलिंग ‘एम’ अक्षरावर आणि ‘भरत’ शब्दाचं स्पेलिंग ‘टी’ अक्षरावर संपायला हवं. तरीही दोन्ही नावांपुढे ‘ए’ अक्षर जोडून ‘रामा’ आणि ‘भरता’ उच्चार करण्याची आपल्याला फारच हौस असते. आपल्या शुद्ध मराठीचा कायम अभिमान मिरवणाऱ्या पुणेकरांना आपल्या शहराच्या ‘पुणे’ नावाची लाज वाटते की काय, म्हणून इंग्रजीत बोलू लागल्यावर ते शहराचं नाव बदलून ‘पुना’ असं ठेवतात. ठाणेकरही तोच कित्ता गिरवत शहराचं नाव ‘ठाना’ असं ठेवतात आणि हळूहळू हिंदीतल्या पुलिस ‘थाना’पर्यंत पोहोचतात. ‘संस्कृत’ या शब्दाचं sanskrut हे स्पेलिंग लिहिता येऊ शकतं. पण आपल्याला हिंदीच्या प्रभावाने ‘संस्क्रित’ असा उच्चार करायचा असल्याने त्याचं स्पेलिंग जाणीवपूर्वक Sanskrit असं लिहिलं जातं. ‘हृदय’ शब्दाचा उच्चार ‘ऱ्हिदय’ (hriday) असा केला जातो. - भाषा-शुद्धतेसंदर्भात अशा विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या लेखमालिकेतील पत्रकार नमिता धुरी यांचा हा तिसरा आणि शेवटचा लेख -
हेही वाचलंत का?
‘ऑफ’ हा शब्द ‘माणूस मेला’ या अर्थाने इग्लंडमध्येही वापरला जात नसेल, पण मराठीत मात्र तो तसा वापरला जातो. मरणे, वारणे, देवाघरी जाणे, देवाज्ञा होणे, मृत्यू होणे असे अनेक शब्द मराठीत उपलब्ध असताना ‘माणूस ऑफ झाला’, असं म्हटलं जातं. मग ही अशुद्ध भाषा नाही का? काहींना तर ‘आमच्या घरी चुहा आला होता’, ‘माझी बॉडी पेन होते’ वगैरे म्हणण्याची सवय असते. काम राहिलंय किंवा खोळंबलंय, थांबलंय असं म्हणण्यापेक्षा ते पेंडिंग आहे हे सांगणे आपल्याला अधिक सोयीचे वाटते. यामागे कारण दिलं जातं की, “ऑफीसमध्ये आम्ही अमराठी वातावरणात वावरतो. तिथे मराठीचा आग्रह धरून चालत नाही”. नका धरू, पण मग
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, शिक्षण
, प्रमाणभाषा
, शुद्ध भाषा
, भाषेची शुद्ध-अशुद्धता