संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर


संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा. मात्र आपल्या सहकाऱ्यांइतके श्रेय गव्हाणकरांना मिळालेले दिसत नाही. शाहीर गव्हाणकरांच्या या कार्याचा आढावा घेणारा प्रतीक्षा रणदिवे यांचा हा लेख -

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्याबरोबरच ज्यांचे मोलाचे योगदान आहे; त्यांपैकी शाहीर द. ना. गव्हाणकर हे एक आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला शाहिरी प्रेरणा या तीन शाहिरांनीच दिली होती. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर द. ना. गव्हाणकर हेही कम्युनिस्ट चळवळीच्या शिस्तीतून तयार झाले होते. कामगार वर्गाशी त्यांचा अत्यंत घनिष्ट संबंध होता. मार्क्सवादाचे, साम्यवादाचे वैचारिक संस्कार अण्णाभाऊ, अमर शेख यांच्याप्रमाणेच त्यांच्यावरही होते. लाल बावटा कला पथकाच्या स्थापनेमध्ये गव्हाणकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. या कलापथकाने सुरुवातीच्या काळात कामगार, शेतकरी, यांचे प्रबोधन केले. त्यांच्याच पाठिंब्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रत्येक टप्प्यावर शाहीर गव्हाणकर यांचा सहभाग होता. अनेक वर्षे ते या कारणास्तव कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांच्या समवेत तुरुंगात होते.
अण्णाभाऊंच्या सर्व लोकनाट्यात गव्हाणकरांची महत्त्वाची भूमिका असे. अण्णाभाऊंची बहुतेक गाणी, पोवाडेही गव्हाणकरच गात होते; त्यामुळे लाल बावटा कलापथकाला संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या या कार्याबद्दल कॉ. रोझा देशपांडे लिहितात, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आमच्या शाहिरांचे योगदान हा या चळवळीचा आनंद होता. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे तीन शाहीर महाराष्ट्रासाठी लढणाऱ्यांना त्रिशूल होते. त्यांची गाणी, कवने, पोवाडे ऐकून, स्फूर्ती घेऊन, प्राणाची पर्वा न करता मराठी माणूस लढत होता.” यावरून शाहीर द. ना. गव्हाणकरांचे कार्य इतर दोन शाहिरांप्रमाणेच किती मोलाचे होते हे स्पष्ट होते.

हेही वाचलंत का?
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर अमर शेख 

शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा जन्म दिनांक २२ एप्रिल १९१५ रोजी बेळगाव जिल्हयातील आजरे या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजरे या गावीच पूर्ण झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूर येथे पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना कलेची आवड निर्माण झाली होती. त्यांच्यावर प्रभाव होता तो ज्येष्ठ शाहीर नानिवडेकर यांचा. शाहीर गव्हाणकर हे नानिवडेकर यांच्याशिवाय शाहीर दीक्षित, शाहीर पिराजी सरनाईक, शाहीर निकम यांच्या काव्यानेही प्रभावित होते. त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज, उमाजी नाईक, बाजी प्रभू देशपांडे, क्रांतिवीर नाना पाटील, यांचे पोवाडे गात असत. अनेक पोवाडे त्यांना तोंडपाठ होते. अत्यंत मधुर आवाज, शाहिरीची उत्तम जाण आणि प्रभावी सादरीकरण हे शाहीर गव्हाणकरांचे वैशिष्टय होते. गव्हाणकर हे अण्णाभाऊ आणि अमर शेख यांच्यापेक्षा वयाने थोडे ज्येष्ठ होते व पक्षकार्याचा अनुभवही त्यांच्यापेक्षा अधिक होता. गव्हाणकर यांनी ‘कामगार रंगभूमी’ या ग्रंथात असे म्हटले आहे की, एकदा कॉ. श्री. अ. डांगे तुरुंगातून सुटून आल्यावर कामगार मैदानावर एक मोठी सभा झाली. त्यावेळी गव्हाणकरांनी शाहीर शंकर निकम यांचा पोवाडा आणि काही गाणी म्हटली. सभा सुरू होण्यापूर्वी गीतगायनाचा कार्यक्रम संपत आला असताना, ज्यांना कुणाला गाणे गायचे आहे त्यांनी व्यासपीठावर येऊन ते म्हणावे, असे गव्हाणकर यांनी जाहीर केले. त्यावेळी श्रोत्यांमधून एका मुलाने हात वर केला, हा मुलगा व्यासपीठावर आला आणि आपल्या खड्या आवाजात त्याने एक गाणे म्हणून श्रोत्यांवर आपली छाप पाडली. हा मुलगा म्हणजे पुढे नामवंत शाहीर म्हणून

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकशाहीर , संयुक्त महाराष्ट्र चळवळ , प्रतीक्षा रणदिवे , मराठी अभ्यास केंद्र , महाराष्ट्राची स्थापना

प्रतिक्रिया

  1. Gajanan Jadhav

      9 महिन्यांपूर्वी

    मराठी शाहिरी रचनेत अनेक शाहिरांनी आपले योगदान दिलेले असून सुरवातीच्या काळात शाहिरांनी राजे, सरदार व गुणसंपन्न व्यक्तीचे गोडवे गायिलेले दिसून येते. यासाठी त्यांनी पोवाड्यातून तर कधी जनसामान्यांना आवडणार्या लावण्या रचलेल्या आहेत. परंतु स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात शाहिरांनी कला पथकाद्वारे खुप मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्व सामान्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्योत्तर काळात आंबेडकरी जलसेनीसुद्धा जनजागृती केलेली दिसते हे शाहिरी रचनेचे खुप मोठे यश आहे. त्याचप्रमाणे यातून शाहिरी रचनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून या रचनेला प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. खुप छान मांडणी... धन्यवाद ????????वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen