भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. 'शब्दांच्या पाऊलखुणा' हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. पेवासंबंधी या लेखातून कृषिसंस्कृतीतील आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या केवढ्या तरी क्लृप्त्या समोर येतात -
हेही वाचलंत का?
लागोभागो दिवाळी!
'घट'स्थापनाप्रेमात नव्हे, पेवात पडणे. तुमच्या वाचण्यात काहीही चुकलेलं नाही की ही मुद्रित शोधनाची चूकही नाही. प्रेमात पडणं तर सगळ्यांनाच माहीत असतं, पण पेवात पडणं कदाचित आत्ताच ऐकलं असण्याची शक्यता आहे. हे नवीन काय म्हणून तुम्ही गूगल महाराजांकडे ‘पेवात पडणे’ ही अक्षरं टंकून विचारणा केलीत तर, सगळे निकाल तुम्हाला प्रेमात पडण्यासंबंधीच दिसतील, इतकं पेवात पडणं अडगळीत गेलेलं आहे. पेवात पडणं हा मराठीत आताशा वापरात नसलेला एक वाक्प्रचार आहे, पण ...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्दवेध
, शब्द व्युत्पत्ती
, शब्दांशी मैत्री
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
, मराठी प्रथम
Gajanan Jadhav
5 वर्षांपूर्वीतीसेक वर्षांपूर्वी मी पेव बघीतले होते. दोन भिंतीच्या आत धान्य साठविण्यासाठी दोन पत्राची जागा केली जात होती..त्यात आठ दहा खंडी धान्य साठवता येत असे.. काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पेव राहण्यासाठीची घरं बनलीयं.. छान माहिती मिळाली...
मस्त.. पेव फुटणे हा एकच वाक्प्रचार माहित होता. त्याचा अर्थ देखील लक्षात आला असला तरी पेव म्हणजे काय? हे तर माहित नव्हतेच, पण हा प्रश्न देखील पडला नाही हे मान्य करायला हवे.. "पेव" बद्दल सविस्तर माहिती मिळाली.. आभार..