Take away आणि Home delivery


                    मी  स्वतः याबाबतीत एकदम निरक्षर होतो. तरुणपणी मला take away म्हणजे आमच्या डोंबिवलीच्या कानिटकरांकडून ऑफिसातून घरी जाताना 100gm भाजी, पोळ्या, अळूवडी, एखादा गोड़ पदार्थ छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांत गुंडाळून घेऊन जाणे एवढंच माहित होतं. लहानपणी आई-बाबा आणि पुढे लग्न झाल्यानंतर बायको घरी नसेल तर करायच्या अनेकज उपद्व्यापांपैकी एक. हॉटेलातून स्वतः जाऊन काही घरी आणून खाणं हा funda च नवीन होता आणि home delivery म्हणजे domino's pizza हे समीकरणं एकदम fit होतं. 

                       त्यामुळे मेतकूट सुरु केल्यावर या आघाडीवर आपल्याला लढायला लागेल याची एवढी कल्पना नव्हती. पण पहिल्याच दिवशी दुपारी जेवढी माणसं आत बसलीएत, तेवढीच बाहेर वेटींगवर आहेत आणि तेवढीच take away साठी आली आहेत असा scene पाहिल्यावर आमचं धाबं दणाणलं. वेटिंग वाढायला लागलं की ती वाट बघणारी माणसं सुध्दा भुकेने कासावीस होऊन take away च्या गर्दीत घुसतात. त्यातच home delivery वाल्यांचे order घेण्यासाठी फोन. हॉटेलचा  सगळा खेळच मुळी दोन ते अडीज तासाचा, दुपारी 1 ते 3 आणि रात्री 8 ते 10. Take away आणि home delivery च्या orders पुरवायला जावं तर आत बसलेले बोंब मारतात. कारण त्यांना पदार्थ मिळायला उशीर व्हायला लागतो. ते रेंगाळले की बाहेरच वेटिंग वाढलं असं दुष्टचक्र. त्यातून मग आमच्या लक्षात आलं की हे department हाताळायला वेगळा माणूस हवा, वेगळा computer हवा.शक्यतो ते सगळं हॉटेलच्या बाहेरच व्हायला हवं.
                      त्यातही Take away आणि delivery हे स्वतंत्र विषय आहेत. Take away वाले लोकं स्वतः येतात, order देतात आणि थांबून स्वतःबरोबरच पार्सल घेऊन जातात. ते हॉटेलच्या services वापरत नाहीत म्हणून त्यांना आम्ही 10% सूट द्यायला सुरुवात  केली. लोकांनी ते खूपच appreciate केलं. Home delivery वाले मात्र फोनवरून किंवा हल्ली website / app वरून order देतात आणि त्यांना ती order तयार करून घरी पाठवावी लागते.या सगळ्यात चुका होण्याच्या अनंत शक्यता असतात. चुकीची order घेणं, चुकीचा पत्ता घेणं, वेगळीच order पाठवणं, पाठवायला वेळ लागणं वगैरे वगैरे. Take away मध्ये सुध्दा पार्सल देताना नीट तपासलं नाही तर भलत्याची पिशवी भलताच घेऊन जातो. दोन्ही ठिकाणी होणाऱ्या चुका पिशवी उघडल्यावर कळणार आणि मग आम्ही शिव्या खाणार. अतिशय काळजीपूर्वक या गोष्टी हाताळाव्या लागतात.
                        पूर्वी Home delivery साठी आम्हीच माणसं ठेवली होती. त्यांना सायकली घेऊन दिल्या (कारण bike नी अपघात होण्याची शक्यता जास्त). त्यात प्रॉब्लेम असा व्हायला लागला की एकतर ती माणसंच दांडी मारायची, किंवा एखादी order द्यायला जायची ती तिकडेच गायब. एक ऑर्डर पोहचवायला दोन तास. नशिबाने यावर उपाय म्हणून Roadrunner नावाची कंपनी सुरु झाली. त्यांचं काम आमच्यासारख्या हॉटेलमधून पार्सल उचलून योग्य माणसाच्या घरी पोहोचवायचं. त्याबद्दल ते वेगळे 40 रु. (किंवा अंतरानुसार अधिक) घेणार. पण खूपच सोयीचं. ग्राहक, हॉटेल दोघांच्या दृष्टीने. पण त्यामुळेच त्यात लगेच अडचणी सुरु झाल्या. लोकांची भूक भागवताना त्या riders ची भूक वाढली. परिणामी आता ती कंपनी संकटात आहे. पण मुंबईत swiggy,  scootsy जोरात आहेत म्हणे. असो.
                       आता जरा आपल्या पदार्थांबद्दल; आपण डॉमिनोजचा पिझ्झा घरी मागवतो - तो किती ताजा, गरम असतो. आला की लगेच खावासा वाटतो ( ते चांगलच आहे कारण वेळ घालवला तर झालाच  वातड...). पण आपले पदार्थ मात्र या कसोटीत उतरत नाहीत. आपली कांदाभजी, मटार पॅटिस कसे होऊन जातात घरी पोचेपर्यंत? सोली बटाट्याची भाजी जास्त वेळ डबाबंद ठेवली तर त्याला वास यायला लागतो. आपल्या कोशिंबिरीतली काकडी, टोमॅटो काही वेळानंतर मरायला लागतात. तेल असणाऱ्या भाज्यांचे तेल सुटं होऊन वरती येत, Take away थाळी पाठवली तर टोमॅटोचं सार आपल्या सीमा ओलांडून बाजूच्या श्रीखंडात घुसतं. सगळ्याचा end result म्हणजे खाण्याच्या सोहोळ्याचा विचका. आपल्या पदार्थांवर खूप संशोधन व्हायला हवं. हे आपले पदार्थ जसे हॉटेलात असतात तसेच घरी जातात कसे जातील हे पाहायला हवं. खूप काम आहे .....



प्रतिक्रिया

  1. Asmita Phadke

      3 वर्षांपूर्वी

    So true.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen