आमचे ‘वा. ल.’: एका विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनांतून


एकेकाळी मराठी साहित्य समीक्षेच्या दालनात विविध कॉलेजांमधील मराठीच्या प्राध्यापकाची मांदियाळी असे. साहित्य, काव्य, जागतिक साहित्य, नवे प्रवाह यांबद्दल आस्था असलेल्या, त्याचा अभ्यास असलेल्या या प्राध्यापकांनी मराठी साहित्याबद्दल गोडी निर्माण केली, साहित्य प्रसार केला आणि विद्यार्थी घडवले. ज्यांच्या आस्वादक शिकवण्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर दीर्घकाळ राही त्यात वा. ल. कुलकर्णी (१९११-१९९१)  हे एक प्रमुख नाव होते.  १९४० नंतरच्या कालखंडात लिहितं झाल्यावर, समीक्षक म्हणून वा.लं.नी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केलीच, शिवाय समीक्षणाला ग्लॅमरही मिळून दिले. अभिरुची, सत्यकथा, छंद, समीक्षा या विविध नियतकालिकांत त्यांनी विपूल लिखाण केले. समीक्षणात्मक लिखाणाचे त्यांचे आठ खंड प्रकाशीत झाले. 'साहित्य आणि समीक्षा', 'साहित्य-शोध आणि बोध', 'साहित्य- स्वरुप आणि समीक्षा', 'मराठी कविता-जुनी आणि नवी' ही त्यांची काही पुस्तके. वालंच्या आस्वादक शिकवण्याचा, व्यक्तिमत्वाचा परिणाम कसा दीर्घकाळ राहिला याची साक्ष देणारा हा लेख त्यांची एक विद्यार्थीनी, सौ. अंजली अनंत गोखले यांनी लिहिला आहे... तसं पाहिलं तर माझी वृत्ती फारशी अभ्यासू नाही. किंबहुना नाहीच म्हटलं तरी चालेल. एस्‌.एस्‌.सी. पास झाल्यावर माझी मैत्रीण कॉलेजमध्ये गेली-मी गेले. अर्थातच सोयीची वेळ व जवळ तेव्हा विल्सन कॉलेजमध्ये आम्ही ‘एफ्‌. वाय्‌.’च्या वर्गात दाखल झालो. सुरुवातीचे थोडेसे दिवस काहीसे गोंधळात, नवेपणात गेले. परंतु एक दिवस काहीतरी अचानक, अनपेक्षित पण फार गमतीशीर घटना घडली. पहिलंच व्याख्यान होतं मराठीचं. - प्रो. वा. ल. कुलकर्णी - ‘इंदू काळे-सरला भोळे’ - वा.म. जोशी. एवढी माहिती वर्गात जाण्यापूर्वी आम्हाला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वसंत , पुनश्च , व्यक्ती परिचय , अंजली अनंत गोखले

प्रतिक्रिया

  1. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख. पूर्वीच्या काळातील शिक्षकांची शिकवण्याची तळमळ , व्यासंग, अफाट होता.त्यामुळे विद्यार्थीही तेव्हाची वही जपून ठेवीत असत. सुंदर.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen