‘ दास कॅपिटल’ची जन्मकथा


अंक- केसरी दिवाळी १९७८

कार्लमार्क्सचा ‘ दास कॅपिटल’ हा तीन खंडांतील ग्रंथ प्रस्थापिताच्या सर्व भिंती धडाधड कोसळून टाकणारा जबरदस्त टाइमबॉंब आहे. मार्क्सच्या भूमिकेवर आजवर अनेक हल्ले झाले. अद्यापीही होत असतात.  मार्क्सचे अर्थशास्त्र आता कालबाह्य ठरत असल्याचा दावाही करण्यात येतो.  शंभर वर्षात अत्यंत वेगाने बदललेले वास्तव लक्षात घेता तो दावा खरा आहेही. परंत ज्या हिरीरीने मार्क्सने श्रमजीवी वर्गाची बाजू मांडली आहे, त्याला तोड नाही. जगाच्या इतिहासात या ग्रंथाला निश्चित असे कायमचे स्थान आहे.  या ग्रंथाचे लिखाण ही मार्क्ससाठी तपश्चर्या होती, कसोटी होती. अशा परिस्थितीशी झूंज देऊन, स्वतःची-कुटुंबाची आबाळ करुन, दारिद्रयाशी लढा देत, तीन खंड पूर्ण करणे हे मुळात सामान्य माणसाचे कामच नव्हे. वेगवान अशा कालप्रवाहावर इतकी स्पष्ट मुद्रा उमटविण्याऱ्या या ग्रंथाचा तिसरा खंड प्रकाशित होऊन १२५ वर्षे होत आहेत. याच महिन्याच्या ५ तारखेला मार्क्सची द्विजन्मशताब्दी संपून वर्ष उलटले. चाळीस वर्षापूर्वी लिहिला गेलेला  प्रस्तुतचा दीर्घ लेख पुन्हा वाचताना मधल्या चार दशकांच्या प्रवासातही या ग्रथांवर अशाच चर्चा होत राहिल्याचे लक्षात येते. विसाव्या शतकावर ज्या ग्रंथांचा विशेष प्रभाव आहे, त्यात डॉ. कार्ल मार्क्स याच्या ‘कॅपिटल्‌’ या ग्रंथाचा समावेश होतो. कम्युनिस्ट  विचारसरणीचे लोक या ग्रंथाला अग्रक्रम देतात हे तर उघडच आहे. परंतु ज्या तत्त्वप्रणाली कम्युनिझमला प्राणपणाने विरोध करीत असतात, त्यांनाही ‘कॅपिटल’कडे दुर्लक्ष करून चालत नाही. ‘‘मार्क्सला अपेक्षित असलेली उद्दिष्टे आम्ही केव्हाच गाठलेली असल्याने त्याचा जाहीरनामा आम्ही कालबाह्य मानतो.’’ 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


केसरी , दीर्घा , पुस्तक परिचय , सुमती देवस्थळे
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Harihar sarang

      4 वर्षांपूर्वी

    अस्वस्थता निर्माण करणारी, पण छान माहिती। मर्क्सवादाचा Essence आणि प्रत्यक्ष अँप्लिकेशन हे दुर्दैवाने सुसंगत राहिले नाही। मानवतावाद हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आत्मा वाटतो। पण व्यवहारांत त्याचे काय झाले,हे आपण बघतोच आहोत। त्यांचा "जाहीरनामा" The Communist Manifesto" वाचला तर साम्यवादाची प्रेरणा लक्षात आल्याशिवाय राहणार नाही।

  2. Ashishchaskar

      6 वर्षांपूर्वी

    छान आहे लेख. आपल्याकडच्या कम्युनिस्टांमुळे मार्क्स बदनाम होतो.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen